अहमदाबाद, 06 मे: कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave in India) ही गेल्यावर्षीच्या कोरोना परिस्थितीपेक्षा अत्यंत भयंकर आहे. या लाटेमुळे भारतासह इंग्लंड-कॅनडामध्ये देखील हाहाकार माजला आहे. भारतात दररोज 3 लाखांहून नवे रुग्ण आढळून येत आहेत तर दररोज साधारण 3 हजार जणांचा मृत्यू होत आहे. अशावेळी अनेकांना भारतातील या गंभीर परिस्थितीची जाणीव होताना दिसत नाही आहे. काही घटनांमध्ये तर अंधश्रद्धेची किनार पाहायला मिळते आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे काही घटना Super Spreader ठरत आहेत. मंगळवारी असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये पाहायला मिळाला. अहमदाबादमधील साणंद तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येतो आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार, हजारोंच्या संख्येनं महिला एकत्र आल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडालेला पाहायला मिळालाच शिवाय कोरोनाची भीती संपल्याप्रमाणे महिलांनी मास्क देखील परिधान केले नव्हते. नवापुरा आणि निधराड गावातून या महिला हजारोंच्या संख्येने बलियादेव मंदिरात पोहोचल्या होत्या. त्यांच्या डोक्यावर कलश होते, पण चेहऱ्यावर मास्क नव्हता.
This is how religious beliefs make people stupid. When #Covid19 is taking hundreds of lives everyday, these #Covidiots are taking out such a huge religious procession. Height of stupidity and foolishness 👇 pic.twitter.com/MZ8hqS6fBe
— Rajesh Raina راجیش رینہ 🇮🇳 (@rainarajesh) May 5, 2021
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार गावात काही लोकांनी अफवा पसरवली होती की कोरोनापासून वाचण्याचा हा उपाय आहे. मीडिया अहवालानुसार कौशिकभाई, धर्मेंद्रभाई वाघेला, दशरथभाई ठाकोर, किशनभाई ठाकोर या गावकऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या पूजेसाठी गावकऱ्यांना एकत्र करण्यात आलं होतं. मंदिरात जलाभिषेक करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे हजारोंच्या संख्येनं महिला डोक्यावर कलश घेऊन याठिकाणी पोहोचल्या होत्या. (हे वाचा- हा आठवडा सांभाळा! सर्वोच्च आकडेवारीचा ‘हाय अलर्ट’,नंतर अशी कमी होणार रुग्णसंख्या ) या कार्यक्रमाला निश्चितच पोलिसांची परवानगी नव्हती. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तोपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होतं, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.