मराठी बातम्या /बातम्या /nashik /

''तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलवलंय'', आधी जबरदस्तीनं गाडीत बसवलं, नंतर लॉजवर नेत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नाशिकमधली घटना

''तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलवलंय'', आधी जबरदस्तीनं गाडीत बसवलं, नंतर लॉजवर नेत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नाशिकमधली घटना

Nashik Crime News: अल्पवयीन (minor girl)  मुलीला बळजबरीनं लॉजवर (Lodge ) नेऊन विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नाशिक, 10 ऑक्टोबर: नाशिकमध्ये (Nashik Crime News) पुन्हा एकदा विनयभंगाची (molestation) घटना घडली आहे. अल्पवयीन (minor girl) मुलीला बळजबरीनं लॉजवर (Lodge ) नेऊन विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातली ही घटना आहे. शाळेत जाणाऱ्या मुलीला तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलावलं असं सांगून आरोपीनं कारमध्ये बसवलं. मुलगी कारमध्ये बसल्यानंतर आरोपीनं कार लॉजवर नेली आणि तिथं तिच्यावर अतिप्रसंग केला.

हेही वाचा- विवाहित महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्याला चोप, मनसे कार्यकर्त्यांनी बेदम हाणलं

पीडित मुलीनं घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतापलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी दानिश खानला मारहाण केली आहे. सध्या आरोपी दानिशवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा- 'पाहुणे अजून गेले नाहीत', 100 तासांपासून पार्थ पवारांच्या कार्यालयात IT ची कारवाई सुरुच 

आरोपी दानिश खान विरोधात काल संध्याकाळी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिडीत मुलीच्या कुटुंबियांचा ओळखीतील व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

First published:

Tags: Nashik, Rape on minor