मराठी बातम्या /बातम्या /nashik /बलात्काराच्या घटनेनं नाशिक हादरलं! तोंडात बोळा कोंबून व्यावसायिक महिलेवर अत्याचार

बलात्काराच्या घटनेनं नाशिक हादरलं! तोंडात बोळा कोंबून व्यावसायिक महिलेवर अत्याचार

Rape in Nashik: नाशिक शहरातील पवननगर परिसरात एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून बलात्कार केला आहे.

Rape in Nashik: नाशिक शहरातील पवननगर परिसरात एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून बलात्कार केला आहे.

Rape in Nashik: नाशिक शहरातील पवननगर परिसरात एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून बलात्कार केला आहे.

नाशिक, 28 सप्टेंबर: देशाला हादरवून सोडणारी मुंबईतील साकीनाका  (Saki naka Rape case) येथील घटना ताजी असताना, डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी अत्याचाराचा कळस गाठला आहे. या घटना ताज्या असताना, नाशिक शहरात महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली आहे. येथील एका व्यावसायिक महिलेवर नराधमाने तोंडात बोळा कोंबून आणि तिचे हात बांधून अत्याचार (rape on beautician in nashik) केला आहे. नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून नाशिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित संतापजनक घटना नाशिक शहरातील पवननगर भागात घडली आहे. पीडित महिलेचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असून सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित महिला आपल्या पार्लरमध्ये देवाची पूजा करीत असताना, संशयित आरोपी तिच्या दुकानात शिरला. यानंतर आरोपीनं पार्लरचा दरवाजा आतून बंद करून चाकूचा धाक दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती केली आहे. नराधमाने पीडित महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तिचे हात बांधत अमानुष पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला आहे.

हेही वाचा-कराड हत्याकांड: ...म्हणून निर्दयी बनली सख्खी बहीण; प्रियकारच्या मदतीने चिरला गळा

या संतापजनक घटनेनंतर पीडित महिलेनं धाडस करून अंबड पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी हा अलीकडेच एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच त्यानं हा बलात्काराचा गंभीर गुन्हा केला आहे.

हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून वर्गमित्राचं विकृत कृत्य; विवाहितेला किचनमध्ये डांबून ठेवलं अन

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी चार पथकं तयार केली आहेत. लवकरच आरोपीला अटक करू असं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Nashik, Rape news