नाशिक, 21 एप्रिल: राज्यासमोर कोरोनाचें संकट (Coronavirus in Maharashtra) असताना नाशिकमधून (Nashik) आणखी एक चिंतेची बाब समोर येत आहे. नाशिकमध्ये वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का (Shocking News from Nashik) बसला आहे. नाशिकमध्ये एकाच दिवसात 11 जणांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या 11 जणांनी चक्कर आल्याने जीव गमावल्याची माहिती मिळते आहे. निमित्त होतं ते श्वास घेण्यास त्रास होण्याचे आणि त्यानंतर त्यांच्या छातीत कळा देखील मारू लागल्या, चक्कर आल्याने त्यांनी प्राण गमावले आहेत. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व व्यक्तींचा मृत्यू त्यांच्याच घरात झाला आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रण बुचकळ्यात पडली आहे. आरोग्य यंत्रणा या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत असून, याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान गेल्या 8 दिवसात अशाप्रकारे मृत्यू झालेल्यांची संख्या 24 झाली आहे. (हे वाचा- रुग्णांच्या नातेवाईकांवर ऑक्सिजन सिलेंडर चोरण्याची वेळ, विदारक VIDEO आला समोर ) 15 एप्रिल रोजी देखील अशीच घटना घडली होती. यादिवशी नाशिक शहरात 9 जण दगावले. त्याआधी दोन दिवसांपूर्वी देखील एकाच दिवसात चक्कर आल्याने 4 जणांचा मृत्यू झाला होता. नाशिकमधील या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चक्कर येणे, मळमळ होणे यासह कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असा सल्ला शहरातील तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. या मृत्यूंमागे वाढत्या तापमान हे कारण आहे की आणखी कोणत्या घटकामुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.