Home /News /nashik /

COVID-19 चे भय संपता संपेना! शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू

COVID-19 चे भय संपता संपेना! शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिकमधून (Coronavirus in Nashik) देखील कोरोना संक्रमणाची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. दरम्यान नाशिकमध्ये नगरसेविका असणाऱ्या कल्पना पांडे (Kalpana Pandey) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 11 एप्रिल: राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होऊ लागली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरात तर आकडेवारी चिंताजनक आहे. मृत्यूदरही वाढत आहे. नाशिकमधून (Coronavirus in Nashik) देखील कोरोना संक्रमणाची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. दरम्यान नाशिकमध्ये नगरसेविका असणाऱ्या कल्पना पांडे (Kalpana Pandey) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पांडे या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. शिवसेनेच्या प्रभाग 24 मधील विद्यमान नगरसेविका म्हणून त्या काम पाहायच्या. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्पना पांडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचाल सुरू होते. नाशिकमध्ये कोरोनाची दहशत कायम नाशिक जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 4294 रुग्णांनी वाढ झाली आहे. हा आकडा मोठा आहे, वेळीच गांभीर्य न लक्षात घेतल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. शनिवारी दिवसभरात नाशिकमध्ये  31  जणांचा मृत्यू झाला असून अवघ्या तीन दिवसांत 100 जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे शनिवारपर्यंत बळींची संख्या 2651 वर गेली आहे. एकट्या नाशिक शहरात शनिवारी दिवसभरात 2087 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. शहरात 10 एप्रिल रोजी बळींची संख्या 15 होती. (हे वाचा-पुनावालांच्या कोरोना लसीबाबतच्या वक्तव्यावर AIIMS च्या संचालकांचं प्रत्युत्तर) रेमडिसीव्हीरचा तुटवडा नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.परंतु, रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून वण वण भटकत आहेत. जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात डॉकटर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी पाठवत आहेत. त्यामुळे निवडक मेडिकल दुकानांसमोर सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबरही कोणी उचलत नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता महात्मा गांधी रोडवर आंदोलन सुरू केलं होतं. मागील काही दिवसांपासून नाशिकमधील आरोग्य यंत्रणा पार कोलमडून गेली आहे. कोरोनाच्या अनेक रुग्णांना याठिकाणी उपाचारासाठी बेड उपलब्ध होतं नाहीयेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची बेडसाठी धावपळ होतं आहे. शिवाय remdesivir चा काळाबाजार ही नवी समस्या डोकं वर काढू लागली आहे. नाशिकमध्ये बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन (Selling fake remdesivir injection) विकल्याची घटनाही समोर आली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना आखल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona, Corona hotspot, Nashik

पुढील बातम्या