Home /News /maharashtra /

तो मारायचा, शिव्या द्यायचा; बहिण संतापली अन् चाकूने सपासप वार करून भावाला संपवलं

तो मारायचा, शिव्या द्यायचा; बहिण संतापली अन् चाकूने सपासप वार करून भावाला संपवलं

कोरोना काळात शोभाच्या मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असतांना देखील संदीपचा त्रास कमी होण्याऐवजी आणखी वाढला होता

कोरोना काळात शोभाच्या मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असतांना देखील संदीपचा त्रास कमी होण्याऐवजी आणखी वाढला होता

कोरोना काळात शोभाच्या मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असतांना देखील संदीपचा त्रास कमी होण्याऐवजी आणखी वाढला होता

 मनमाड, 26 एप्रिल : भाऊ नेहमी शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून बहिणीने (Sister kills brother ) टोकाचे पाऊल उचलत थेट लहान भावाच्या पोटावर चाकूने वार करुन त्याचा निर्घृणपणे खून (murder) केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना मनमाडमध्ये (manmad) घडली आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विवेकानंद नगर क्र.2 या भागात दुपारी ही घटना घडली. संदीप गोंगे (वय 45) असं मयताचे नाव असून खून केल्यानंतर आरोपी बहिण शोभा गारुडकर(वय 55) स्वतः पोलीस स्थानक हजर झाली आणि मी माझ्या भावाचा खून केल्याची तीने कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिले विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विवेकानंद नगर क्र.2 मध्ये  संदीप गोंगे हा आई आणि इतर नातेवाईकांसोबत राहत होता. आई आजारी असल्यामुळे तिची सेवा करण्यासाठी श्रीरामपूर येथे राहणारी त्याची बहीण शोभा गारुडकर ही काही महिन्यापूर्वी मनमाडला आली होती. संदीप हा व्यसनी होता. तो शोभाला नेहमीच त्रास देत असे. येथे आल्यावर त्याचा त्रास वाढला होता. रोज काहीही कुरापत काढून तो तिला शिवीगाळ करून कधी कधी मारहाण देखील करायचा. ('विकृत मनोवृत्तीचे हे एक उदाहरण', रुपाली चाकणकर यांचा नवनीत राणांना सणसणीत टोला) कोरोना काळात शोभाच्या मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असतांना देखील संदीपचा त्रास कमी होण्याऐवजी आणखी वाढला होता. आज दुपारी ती जेवण करीत असतांना संदीपने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शोभाने टोकाचे पाऊल उचलत संदीपच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. घाव वर्मी लागल्यामुळे संदीप रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. राग आणि संतापाच्या भरात आपल्याकडून मोठी चूक झाल्याची जाणीव होताच शोभने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि मी माझ्या लहान भावाचा खून केल्याची तिने कबुली दिली. (आदिमानवांच्या गुहा चित्रांबद्दल अनोखी माहिती समोर, आतापर्यंतची गृहितकं ठरणार फेल) घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधिक्षक समीरसिंग साळवे, सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते, उपनिरीक्षक पी.डी. सरोवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शोभा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या