मराठी बातम्या /बातम्या /nashik /

लाचखोरी प्रकरणी नाशकातील शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात; 8 लाखांची लाच घेताना चालकाला रंगेहाथ अटक

लाचखोरी प्रकरणी नाशकातील शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात; 8 लाखांची लाच घेताना चालकाला रंगेहाथ अटक

वैशाली झनकर यांना जिल्हा सत्रन्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

वैशाली झनकर यांना जिल्हा सत्रन्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Bribe Case in Nashik: एका संस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच (8 Lakh Bribe) स्वीकारल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांना अटक करण्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk

नाशिक, 11 ऑगस्ट: शाळांना मंजूर करण्यात आलेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याचा कार्यादेश काढून देण्याच्या मोबदल्यात एका संस्थेकडून 8 लाख रुपयांची लाच (8 Lakh Bribe) स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक (Woman education officer arrest ) करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर (Dr. Vaishali Zankar-Vir) यांच्यासह शासकीय वाहनचालक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे.

शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी 9 लाख रुपयांची मागणी केली होती. पण तडजोडीनंतर आठ लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. यानंतर संबंधित संस्थाचालकानं याची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. लाचलुचपत विभागानं तक्रारीची शाहनिशा केल्यानंतर, सापळा रचून आरोपी शिक्षणाधिकाऱ्याच्या हस्तकाला अटक केली आहे.

हेही वाचा-मोबाइल नंबर बंद असतानाही बँक खात्यातून 16 लाख लंपास; प्लानिंग पाहून पोलिस हैराण

मंगळवारी सायंकाळी ठरल्याप्रमाणे शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांचा शासकिय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सुर्यकांत येवले हा आठ लाख रुपयांची रक्कम स्विकारण्यासाठी जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला. यावेळी त्याने तक्रारदार संस्थाचालकाकडून 8 लाख रुपयांची रक्कम स्विकारली. ही रक्कम स्विकारताच पथकानं झनकर यांच्या वाहनचालकास रंगेहाथ पकडलं आहे. त्याची कसून चौकशी केली असता, तो शिक्षणाधिकारी झनकर यांच्या सांगण्यावरून ही रक्कम घेतल्याचं सांगितलं. यानंतर पथकानं जिल्हा परिषदेच्या वास्तुमध्ये धडक देत झनकर यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा-व्याजाच्या पैशांसाठी महिलेचा छळ; बंदुकीचा धाक दाखवत सावकाराकडून अनेकदा बलात्कार

रात्री उशीरापर्यंत चौकशी केल्यानंतर, संशयित आरोपी झनकर यांनी तडजोडअंती 8 लाख रुपयांची रक्कम स्विकारल्याचं मान्य करत पुढील व्यवहार चालक येवले आणि अन्य एका जिल्हा परिषदेच्या शिक्षणासोबत करण्यास सांगितलं होतं, अशी माहिती पथकाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. रात्री उशीरा भद्रकाली पोलीस ठाण्यात झनकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Nashik