• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • OMG! मोबाइल नंबर बंद असतानाही बँक खात्यातून 16 लाख लंपास; चोरीची प्लानिंग पाहून पोलिसही हैराण

OMG! मोबाइल नंबर बंद असतानाही बँक खात्यातून 16 लाख लंपास; चोरीची प्लानिंग पाहून पोलिसही हैराण

चोरांनी टप्प्या टप्प्याने याचं प्लानिंग केलं होतं. गेल्या 2 वर्षात या चोराने तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

 • Share this:
  गाजियाबाद, 9 ऑगस्ट : देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाजियाबादमधील जालसाजी (Forgery) मधून एक विचित्र घटना समोर आली आहे. फसवणूक करणाऱ्या काही तरुणांनी काही महिन्यांपूर्वी बंद झालेल्या मोबाइल नंबरचा वापर करीत (Mobile Number) एका खात्यातून 16 लाख रुपये काढले आहेत. तर ज्याच्यासोबत ही फसवणूक झाली त्याची बहीण जीएसटी विभागात डेप्युटी कमिश्नर आहे. या प्रकरणात मधुबन बापूधाम पोलीस आणि सायबर सेलने (Madhuban Bapudham Police and Cyber ​​Cell) 4 गुन्हेगारांना अटक केली आहे. हा सर्व प्रकार पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या आरोपींती नावे भानु प्रताप शर्मा, त्रिलोक शर्मा, दीपक आणि विपिन राठोड आहे. या गुन्हेगारांकडे अनेक मोबाइल, 20 हून अधिक एटीएम, 5 लाख कॅश आणि फसवणुकीच्या रकमेतून खरेदी केलेली आर्टिगा कार जप्त केली आहे. असा केला फ्रॉड सीओ सायबर सेलचे अभय कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांच्या खात्यातून पैसे गेले त्या व्यक्तीचं नाव गौरव असून त्याचा आधार आणि बँक खात्याशी लिंक नंबर रिचार्ज नसल्यामुळे बंद झाला होता. गौरव याने बँक ऑफ बडोदामध्ये नंबर अपडेट करण्यासाठी अॅप्लीकेशन दिलं होतं. मात्र ते अपडेट झालं नाही. काही महिन्यांनंतर तोच नंबर दिल्लीत राहणाऱ्या विपिन राठोड याला देण्यात आला. जेव्हा त्याला बँकशी संबंधित मेसेज आला, तेव्हा त्याने याबाबत आपला मित्र भानुला याबाबत माहिती दिली. भानुने नंबर तपासलं तेव्हा हा नंबर गौरव गुप्ताचा असल्याचं समोर आलं. भानुने विपिनसोबत मिळून बनावटी पेपस तयार करीत फसवणुकीचा प्लान तयार केला. भानुने आपल्या सहकाऱ्याला 8 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं. यानंतर भानुने दीपक नावाच्या व्यक्तीला गौरव गुप्ताचा आधार कार्ड डाऊनलोड करण्याचं काम दिलं. यासाठी 1 लाख 30 हजार रुपयांचा करार झाला. दीपकने युट्यूबवर मोबाइल नंबरच्या माध्यमातून आधार कार्ड काढण्याची पद्धत शिकवली. गौरव गुप्ताचा आधार डाऊनलोड करीत त्यात विपिन राठोड याचा फोटो लावला. या बनावटी डॉक्युमेंटच्या आधारावर बँक ऑफ बडोदामधून गौरव गुप्ताच्या खात्याशी संबंधित नवीन डेबिट कार्ड जारी केलं. हे ही वाचा-गच्चीवर झोपलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, चपलेमुळे झाला खुनाचा उलगडा यानंतर त्रिलोक शर्माने डेबिट कार्डच्या माध्यमातून गौरव गुप्ताच्या खात्यातून नेट बँकिगच्या माध्यमातून 16 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्याची वाटणीदेखील केली. याशिवाय त्रिलोक शर्माने एक जुनी आर्टिक कार खरेदी केली. आपल्यासोबत धोका झाल्याचं समोर आल्यानंतर गौरव गुप्ताने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलीस आणि सायबर सेलच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली. भानुने गेल्या दोन वर्षात 1 कोटींहून अधिक फ्रॉड केल्याचंही समोर आलं आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published: