• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 100 तासांपासून IT अधिकारी पार्थ पवारांच्या कार्यालयात तळ ठोकून, कारवाईचा चौथा दिवस

100 तासांपासून IT अधिकारी पार्थ पवारांच्या कार्यालयात तळ ठोकून, कारवाईचा चौथा दिवस

पार्थ पवार यांच्या कार्यालयात कागद पत्रांची पडताळणी सुरूच आहे. नरीमन पॉईंट येथील निर्मल भवन इथल्या सीड ट्री इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर ही छापेमारी सुरु आहे.

 • Share this:
  मुंबई, 10 ऑक्टोबर: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापा टाकला. आज सलग 100 तासांपासून आयटीची धाड (Income Tax Raid) सुरुच असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पार्थ पवार यांच्या कार्यालयात कागद पत्रांची पडताळणी सुरूच आहे. नरीमन पॉईंट येथील निर्मल भवन इथल्या सीड ट्री इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर ही छापेमारी सुरु आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर सध्या आयकर विभागाकडून धाडीसत्र सुरु आहे. यात आयकर विभागानं पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, नंदूरबार आणि मुंबईत धाडी मारल्या. हेही वाचा- सोडून दिलेल्या 6 जणांमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार होते?, NCBनं म्हटलं... पार्थ पवारांच्या मुंबईतल्या कार्यालयात आयटीकडून सलग चौथ्या दिवशी कारवाई असल्याचं समजतंय. आज सकाळी पुन्हा 7 वाजल्यापासून आयटीनं कारवाईस सुरुवात केली. यावेळी कार्यालयात सहा ते सात अधिकाही अजूनही कारवाई करत असल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ पवारांच्या कार्यालयात आयकर विभागाचे सर्व कर्मचारी तयारीनिशी दाखल झाले. आयटीच्या अधिकाऱ्यांनी काल फोल्डर आणि अतिरिक्त एनव्हलप मागवल्याची माहिती आहे. पार्थ पवारांच्या कार्यालयात आयकर विभागाच्या 7 ते 8 अधिकाऱ्यांनी तीन रात्री घालवल्या आहेत. नंदुरबारमधील कारखान्यावर छापा सत्र थांबले अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी आयकर विभागाने धाड (Income Tax Department) टाकली. नंदुरबारमधील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावरही (aayan Multitrade LLP Sugar Factory Nandurbar) छापा टाकण्यात आला होता. तब्बल 70 तासानंतर आयकर विभागाचे पथक कारखान्या बाहेर आले आहे. 3 दिवसानंतर कारवाई संपुष्टात आली आहे. हेही वाचा- संजय राऊतांकडून प्रियंका गांधींचं कौतुक, सांगितली राहुल गांधींच्या मनातली  खंत  नंदुरबारच्या समशेरपुर स्थित आयान मल्टीट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभागाचे छापा टाकला होता. तब्बल तीन दिवशी ही कारवाई सुरू होती. तीन दिवसांपूर्वी या कारखान्यात दाखल झालेल्या आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून होते. कार्यालयातील कागदपत्रांसह संगणक आणि इतर गोष्टींची झाडाझडती घेत होते. तब्बल तीन दिवस ही कारवाई सुरू होती. अखेर काल 9 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दोन तुकड्या कंपनीतून बाहेर पडल्या आहे. नेमकं कारवाईत काय मिळालं याबाबत बोलण्यास मात्र नकार दिला आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: