मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /विवाहित महिलेचे अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप

विवाहित महिलेचे अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप

विवाहित महिलेला (Married woman) प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर महिलेचे अश्लील व्हिडिओ (Pornographic videos) काढले.

विवाहित महिलेला (Married woman) प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर महिलेचे अश्लील व्हिडिओ (Pornographic videos) काढले.

विवाहित महिलेला (Married woman) प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर महिलेचे अश्लील व्हिडिओ (Pornographic videos) काढले.

वसई, 10 ऑक्टोबर: मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) कार्यकर्त्यांनी एका वासनांध तरुणाला बेदम चोप दिल्याची माहिती समोर येतेय. वसईतील (Vasai) ही घटना आहे. या तरुणानं विवाहित महिलेला (Married woman) प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्यानंतर महिलेचे अश्लील व्हिडिओ (Pornographic videos) काढले. या अश्लील व्हिडिओच्या आधारे तरुण विवाहित महिलेला ब्लॅकमेल करत होता.

मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाला केलेल्या मारहणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 8 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारा ही घटना घडली. मुंबईजवळच्या वसई- नायगाव रेल्वे स्टेशन परिसरातील ही घटना आहे.

हेही वाचा- सोडून दिलेल्या 6 जणांमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार होते?, NCBनं म्हटलं...

मनोज थोरात असं कार्यकर्त्यांनी चोप दिलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मुंबईतल्या चुनाभट्टी येथे राहतो.

नेमकं काय आहे प्रकरण

गेल्या काही महिन्यांपासून हा मनोज थोरात विवाहित महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवायचा. तसंच तिचा पाठलाग करणं, ब्लॅकमेल करणं, शारीरिक आणि मानसिक त्रास देणं असे प्रकार वारंवार करत होता. या त्रासाला कंटाळलेली पीडित महिला मुंबईहून वसई नायगाव येथे कुटंबांसोबत राहण्यास आली. मात्र नायगावमध्ये आल्यानंतरही आरोपीचं त्रास देणं सुरुच होतं.

पीडित महिलेची मनसेकडे धाव

पीडित महिलेनं अखेर मनसे पदाधिकारी प्रफुल कदम यांना सर्व प्रकार सांगितला. प्रफुल कदम यांनी मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर, माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांना या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा- संजय राऊतांकडून प्रियंका गांधींचं कौतुक, सांगितली राहुल गांधींच्या मनातली  खंत 

त्यानंतर प्रफुल कदम आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला ट्रॅप लावलं आणि पकडलं. मनसे कार्यकर्त्यांनी नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात मनोज थोरातला बेदम चोप दिला. चोप दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला वालीव पोलिसांच्या ताब्यात दिलं.

First published:

Tags: MNS