या घटनेने परिसरात एकच गोंधळ आणि खळबळ उडाली. नेमकं काय झालं याबाबत नागरिकांना सुरुवातीला काही कळलेच नाही. या घटनेनंतर नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. आरोपी ट्रकचालक हा दारुच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकऱणी पोलिसांनी गुन्हा दाखळ करुन अधिक तपास सुरू केला आहे. यवतमाळमध्ये सुद्धा घडलेला असाच प्रकार या महिन्याच्या सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथे भीषण अपघात घडला होता. एका मद्यधुंद आयशर ट्रक चालकाने बेदकारपणे गाडी चालवत कार, ऑटो, दुचाकीला धडक दिली. या भीषण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात 4 जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. आयशर चालक अजीम खान गफुर खान याने पांढरकवडा शहरातील बाजारपेठेतून काही माल खरेदी केला. त्यानंतर तो आयशर वाहन घेऊन बोरी गावाकडे निघाला. यावेळी तो प्रचंड दारू पिऊन होता. गोपालकृष्ण मंदिर परिसरात हे ट्रक पोहोचला असता अजीम खानचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटो , दुचाकी आणि कार या वाहनांना धडक दिली. समोर आलेल्या वाहनांना धडक देत तो पुढे जात होता. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.नाशकात भरधाव ट्रकची 3 ते 4 वाहनांना धडक pic.twitter.com/ydn5U3Fnqe
— News18Lokmat (@News18lokmat) October 30, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.