मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /यवतमाळमध्ये 'संतोष माने' अवतरला, मद्यधुंद चालकाने 4 वाहनांना चिरडले, VIDEO

यवतमाळमध्ये 'संतोष माने' अवतरला, मद्यधुंद चालकाने 4 वाहनांना चिरडले, VIDEO

अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर आयशर ट्रक काही अंतरावर डिव्हायडर तोडून  विजेच्या खांबावर जाऊन आदळला.

अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर आयशर ट्रक काही अंतरावर डिव्हायडर तोडून विजेच्या खांबावर जाऊन आदळला.

अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर आयशर ट्रक काही अंतरावर डिव्हायडर तोडून विजेच्या खांबावर जाऊन आदळला.

यवतमाळ, 10 ऑक्टोबर : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील रहिवाशांना पुण्यातील संतोष माने दुर्घटनेचा थरार पाहण्यास मिळाला. एका मद्यधुंद आयशर ट्रक (Eicher truck) चालकाने बेदकारपणे गाडी चालवत कार, ऑटो, दुचाकीला धडक दिली. या भीषण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात 4 जण किरकोळ जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली.  आयशर चालक अजीम खान गफुर खान याने पांढरकवडा शहरातील बाजारपेठेतून काही माल खरेदी केला. त्यानंतर तो आयशर वाहन घेऊन बोरी गावाकडे निघाला. यावेळी तो प्रचंड दारू पिऊन होता.

गोपालकृष्ण मंदिर परिसरात हे ट्रक पोहोचला असता अजीम खानचे नियंत्रण सुटले आणि  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटो , दुचाकी आणि कार या वाहनांना धडक दिली. समोर आलेल्या वाहनांना धडक देत तो पुढे जात होता.  त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

शार्दुलनंतर आणखी एका 'ठाकूर'ने गाजवलं ऑस्ट्रेलिया, रेणुकाचा पदार्पणातच धमाका!

अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर आयशर ट्रक काही अंतरावर डिव्हायडर तोडून  विजेच्या खांबावर जाऊन आदळला. त्यामुळे शेवटी हा ट्रक थांबला. संतापलेल्या लोकांनी ट्रकमधून चालक अजीम खानला बाहेर काढलं. पण, तो प्रचंड प्यायलेला होता हे लक्षात आले. लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला.

या दुर्घटनेत चालक अजीम खान गफूर खान यांच्या सह चार जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले असून  गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Yavatmal