मराठी बातम्या /बातम्या /nashik /

राज ठाकरे इज बॅक, गड पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी नव्याने करणार मोर्चेबांधणी!

राज ठाकरे इज बॅक, गड पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी नव्याने करणार मोर्चेबांधणी!

मनसेच्या स्थापनेपासून नाशिक हा मनसेचा गड राहिला आहे. नाशकात मनसेनं एकहाती सत्ता राखली होती.

मनसेच्या स्थापनेपासून नाशिक हा मनसेचा गड राहिला आहे. नाशकात मनसेनं एकहाती सत्ता राखली होती.

मनसेच्या स्थापनेपासून नाशिक हा मनसेचा गड राहिला आहे. नाशकात मनसेनं एकहाती सत्ता राखली होती.

  • Published by:  sachin Salve

नाशिक, 11 जुलै : महाविकास आघाडी सरकारचे (mva goverment) तिन्ही पक्ष स्वबळाचा नारा देत पक्ष बळकट करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतले आहे. तर दुसरीकडे मनसेनंही (mns) आपला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) नाशिक पालिका निवडणुकीच्या (nashik municipal corporation election) पार्श्वभूमीवर कामाला लागले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार झाले आहे. पुढील आठवड्यात 16 जुलैपासून राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 3 दिवशीय हा दौरा असणार आहे. या काळात नाशिकमध्ये मनसेची झालेली पडझड, संघटनात्मक पातळीवर राज ठाकरे आढावा घेणार आहे. यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठकही घेणार असल्याची माहिती समोर आली आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.

चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा गेला तोल, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती. पण सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मनसेला मोठी गळती लागली. अनेक नेते आणि नगरसेवक भाजप आणि सेनेत सामील झाले. त्यामुळे नाशकात मनसेची नव्याने बांधणीसाठी राज यांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे, असं सांगितलं जात आहे. कोरोना काळात राज यांनी याआधीही नाशिकमध्ये येऊन मनसेसैनिकांची भेट घेतली होती.

लव्हस्टरी फेम कुमार गौरव का झाले बॉलिवूडमधून गायब? 21 वर्ष काय करतायेत

विशेष म्हणजे, नाशिक आणि मनसे हे जुनं नात आहे. मनसेच्या स्थापनेपासून नाशिक हा मनसेचा गड राहिला आहे. नाशकात मनसेनं एकहाती सत्ता राखली होती. एवढंच नाहीतर 3 आमदार सुद्धा या शहरातून निवडून आले होते. पण, मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे मनसेची मोठी पडछड झाली. अनेक नेते फितूर झाले त्यामुळे मनसेला सत्ता गमवावी लागली. आता शहरातील राजकीय परिस्थिती पाहता मनसेला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी खुणावत आहे. त्यामुळेच राज ठाकरे आतापासूनच कामाला लागले आहे.

First published:

Tags: MNS, Raj Thackery, मनसे, राज ठाकरे