मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Malegaon News: सेल्फीचं झालं निमित्त आणि एकाच वेळी दोघा सख्ख्या भावांची निघाली अंत्ययात्रा; पालकांचा काळीज चिरणारा टाहो

Malegaon News: सेल्फीचं झालं निमित्त आणि एकाच वेळी दोघा सख्ख्या भावांची निघाली अंत्ययात्रा; पालकांचा काळीज चिरणारा टाहो

Malegaon News: कितीही अपघात झाले तरी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचं वेड तरुण काही सोडत नाहीत असं चित्र आहे.

Malegaon News: कितीही अपघात झाले तरी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचं वेड तरुण काही सोडत नाहीत असं चित्र आहे.

Malegaon News: कितीही अपघात झाले तरी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचं वेड तरुण काही सोडत नाहीत असं चित्र आहे.

  • Published by:  News18 Desk
मालेगाव, 25 मार्च : तरुणांमधील सेल्फीचं वेड अनेक अपघात होऊनही कमी होताना दिसत नाही. 24 मार्च रोजी दोन सख्ख्या भावांचा सेल्फी घेताना तोल गेला आणि ते पाण्यात बुडून जीवाला मुकले. (Malegaon News) मालेगाव तालुक्यातील वीराने शिवाराच्या बोरी नदीवरील धरणात बुडून हर्षल आणि रितेश या दोन भावांचा मृत्यू झाला. हर्षल नाशिकला अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता तर रितेश मालेगावमध्ये बारावीला होता. या घटनेनं त्यांच्या पालकांसह पंचक्रोशीतील लोकांनाही मोठाच धक्का बसला आहे. हे दोघेही मालेगाव तालुक्यातील अजंग इथले रहिवासी होते. (Malegaon Selfie Accident) हेही वाचा सेल्फीनं केला घात; मालेगावतील दोन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू या दोघांवर रात्री उशीरा अजंग इथं अंत्यसंस्कार झाले तेव्हा आई-वडिलांचा टाहो अनेकांचं काळीज चिरून गेला. हर्षल आता हाताशी आला होता. आजवर केलेल्या कष्टांचं उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलानं चीज केलं. आता तो कमावता होईल आणि आपल्यालाही कष्टाच्या जगण्यात थोडा विसावा मिळेल हेच साधं स्वप्न आई-वडिलांनी पाहिलं होतं. मात्र केवळ हर्षल नाही तर रितेशही काळानं त्यांच्यापासून हिरावून नेला. (Ritesh and Harshal Jadhav die taking selfie) हेही वाचा कोल्हापूरमध्ये प्रेमवीराने केला कळस, 2 KM अंतराच्या रस्त्यावर लिहिला हा मेसेज वडील एका संस्थेत शिक्षक आहेत आणि बरीच वर्ष त्यांनी विनाअनुदान तत्वावर काम केलं. सोबतच केशकर्तनाचा व्यवसाय करून त्यांनी संसार चालवला. आता कुठं थोडं सुख त्यांना दिसत होतं. तोच हा दुःखाचा डोंगर कोसळला. दोन्ही तरुण उमद्या भावांची एकत्रच निघालेली अंत्ययात्रा पाहताना अनेकांच्या अश्रूचा बांध फुटला होता. आई-वडिलांना समाजवताना अनेकांनी आपल्याही अनावर झालेल्या भावनांना वाट करून दिली. (dam selfie accident of two brothers)
First published:

Tags: Crime news, Death, Malegaon, Malegaon news

पुढील बातम्या