कोल्हापूर, 24 मार्च : 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं,' याची प्रचिती कधी येईल ते सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अशाच एका प्रेमवीराची जोरदार चर्चा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या (Kolhapur District) शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती या गावापासून जयसिंगपूर शहरापर्यंत अडीच किलोमीटरचा मार्ग सध्या चर्चेत आहे.
धरणगुत्ती या गावातल्या एका प्रेमवीराने या रस्त्यावर चक्क 'आय लव्ह यू' आणि 'आय मिस यू' असं ऑइल पेंटने लिहिलं आहे. मग काय या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली असून हा प्रेमवीर नक्की कोण आहे, याबाबत कयास केला जात आहे. सदर तरुणाची प्रेयसी कदाचित याच रस्त्याने दररोज कॉलेजला जयसिंगपूरला जात असेल असा अंदाज बांधला जात आहे.
हेही वाचा - पुण्यातील संभाव्य कडक लॉकडाऊनबाबत महापौरांनी घेतली स्पष्ट भूमिका
डांबरी रस्त्यावर चक्क ऑइल पेंटने असा लिहिलेला मेसेज पाहून वाहनधारक आणि नागरिक अचंबित होत आहेत. पण ज्यावेळी याचा खुलासा होईल त्यावेळी त्यात प्रेमवीराबाबत या चर्चांना पूर्णविराम मिळेलच, पण स्थानिक प्रशासनाने या मेसेजची तात्काळ दखल घेत कर्मचाऱ्यांच्या मार्फत डांबरी रस्त्यावरचा हा मेसेज तात्काळ हटविण्यात आला. म्हणजेच त्या मेसेजवर पुन्हा पांढरा ऑइल पेंट कलर देण्यात आला.
गेल्या वर्षभरात कोरोना काळात लॉकडाउन असल्याने अनेक प्रेम प्रकरणं समोर आली, तर अनेक प्रेम प्रकरणांमध्ये अंतरही पडलं. पुण्यातही काही दिवसांपूर्वी असेच प्रेम प्रकरणाचे फलक लागले होते. म्हणूनच शिरोळ तालुक्यातल्या या डांबरी रस्त्यांवरच्या मेसेजची देखील जोरदार चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे,
अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये अनेक कॉलेजेस सुरू झाली आहेत. त्यामुळे हा कॉलेज कुमार आहे की नोकरदार आहे की आणखी कोण आहे याचाही खुलासा होणे अजून बाकी आहे. पण अडीच किलोमीटर रस्त्यावर चक्क ऑइल पेंटने असे मेसेज लिहिणारा हा प्रेमवीर शहर आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला, एवढं मात्र नक्की.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Love, Maharashtra, Mumbai, Relationship, Shiro