• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • हृदयद्रावक! सेल्फीनं केला घात; मालेगावतील दोन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू

हृदयद्रावक! सेल्फीनं केला घात; मालेगावतील दोन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू

हे दोघे भाऊ धरणाच्या काठावर उभे राहून सेल्फी (Accident while taking selfie) घेत होते, त्यावेळी तोल गेला आणि...

  • Share this:
मालेगाव, 24 मार्च: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव इथे दोन भावंडांचा धरणात बुडून मृत्यू (Two siblings death) झाला आहे. दोघे भाऊ धरणाच्या काठावर उभे राहून सेल्फी (Accident while taking selfie) घेत होते. यावेळी दोघांचाही तोल गेला आणि ते पाण्यात पडले (drown in dam) आणि पण दोघांनाही पोहता येत नसल्यानं दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मालेगावच्या विराणे शिवारात घडली आहे. दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. हर्षल जाधव आणि रितेश जाधव अशी या दोन भावंडांची नावं आहेत. 21 वर्षीय हर्षल देविदास जाधव आणि 18 वर्षीय रितेश देविदास जाधव हे दोघंही मालेगाव तालुक्यातील अजंग येथील रहिवासी आहेत. आज (24 मार्च रोजी)  दोन्ही भावंड आपल्या दुचाकीने निमशेवडी याठिकाणी लग्नासाठी गेले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना रस्त्यातील विराणे येथील माळमाथा पाणीपुरवठा योजना धरणाजवळ थांबले. त्यानंतर सेल्फी काढण्यासाठी ते धरणाच्या काठापर्यंत पोहचले. यावेळी धरणाच्या काठावर उभा राहून सेल्फी काढत असताना धरणाच्या उतारावरून लहान भाऊ रितेशचा पाय घसरला. आणि तो धरणात पडला. लहान भावाला वाचवण्यासाठी मोठा भाऊ हर्षलही पाण्यात उतरला. पण दोघांनाही पोहता येत नसल्यानं ते धरणात बुडाले. दरम्यान त्यांचा चुलत भाऊ भावेश जाधव पाठीमागून येत होता. यावेळी त्याचं लक्ष दुचाकीकडे गेल्यानंतर संबंधित प्रकार त्याच्या लक्षात आला. हे ही वाचा-Miss You आईने whatsapp स्टेटस ठेवलं अन थोड्याच वेळात आली मुलाच्या मृत्यूची बातमी भावेशनं आरडाओरडा करून परिसरातील ग्रामस्थांना मदतीसाठी हाका मारल्या. यावेळी गावचे सरपंच नंदकुमार सोनवणे त्यांच्या मदतीला धावत आले. गावातील तरुण पिंटू माळी यांच्यासह पाच-सहा तरुणांनी पाण्यात उड्या घेवून हर्षल आणि रितेशला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. दोघांचाही घटनस्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. हर्षल हा नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता, तर लहान भाऊ रितेश हा मालेगाच्या मसगा महाविद्यालयात 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्यांच्या या घडनेनं गावात शोककळा पसरली आहे.
Published by:News18 Desk
First published: