नाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video; रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा

नाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video; रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा

Attack Live Video: नाशिक (Nashik) शहरातील वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला (Attack on two brothers) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपींनी चिकनच्या दुकानातील कोयत्यानं दोघांवर भररस्त्यात सपासप वार केले आहेत.

  • Share this:

नाशिक, 26 जुलै: नाशिक (Nashik) शहरातील वडाळा नाका परिसरात दोघा भावांवर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला (Attack on two brothers) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपींनी चिकनच्या दुकानातील कोयत्यानं दोघांवर भररस्त्यात सपासप वार केले आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियात वेगान व्हायरल होतं आहे.

विशेष म्हणजे या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर देखील पोलिसांनी कारवाई करण्यात विलंब लावला आहे. त्यामुळे परिसरातील दुकानदारांकडून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. अमीर खान आणि मझर खान असं हल्ला झालेल्या दोघां भावांची नावं असून दोघांनाही स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हेही वाचा-गर्भवती लेकीच्या मृतदेहाचे जमिनीत गाडलेले 12 तुकडे काढून केलं अंत्यसंस्कार

नेमकी घटना काय आहे?

पीडित भावांचं आणि आरोपीचं नाशकातील वडाळा नाका परिसरात चिकनचं दुकान आहे. दरम्यान जखमी भाऊ अमीर खान आणि मझर खान यांनी संबंधित चिकन दुकानदाराची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांत तक्रार दिल्यानं आरोपींनी दुकानासमोर येऊन जाब विचारायला सुरुवात केली. यातूनच वाद पेटत गेला. यामुळे आरोपीने संतापाच्या भरात दोघा भावांवर चिकनच्या दुकानातील कोयत्यानं वार केला. या हल्ल्यात दोन्ही भावंड रक्ताच्या थारोळ्यात पडले आहे.

हेही वाचा-मुंबईत सख्ख्या मेहुण्यावर दारुच्या बाटलीने सपासप वार; धक्कादायक कारण आलं समोर

आरोपींनी हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. यानंतर परिसरातील लोकांनी जखमी भावांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे रस्त्यावर अनेक लोकांनी घटना पाहण्यासाठी गर्दी केली होती. हल्ला झाल्यानंतर रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी रक्त सांडलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

Published by: News18 Desk
First published: July 26, 2021, 5:25 PM IST

ताज्या बातम्या