पाटना, 26 जुलै: नालंदातील नोनिया गावातून एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. या गावातील एका कुटुंबातील व्यक्तींनी अवघ्या 6 लाख रुपयांसाठी 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या केली. इतकच नाही तर सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 12 तुकडे केले आणि जमिनीत दफन केले. यानंतर काजलच्या माहेरच्या मंडळींनी 21 जुलै रोजी तिच्या सासरमधील 400 मीटर लांबपर्यंत मृतदेहाचे तुकडे बाहेर काढले होते. यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. काजलचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात काजलचे पती संजीत कुमार, सासरे, दोन नणंदा त्यांचे पती आणि दीर अशा सात लोकांची नावं समोर आली आहे. हे सातही जणं सध्या फरार आहेत. (Killed a 5-month-pregnant woman for a dowry of Rs 6 lakh. After that the body was cut into 12 pieces and buried in the ground.) काजलच्या भावाने सांगितलं की, एफआयआरमध्ये तिचा मृतदेह 12 तुकड्यांमध्ये मिळाल्याचं लिहित होतं, मात्र पोलिसांनी यास नकार दिला. यावर बंटी म्हणाला की, पोलिसांनी नकार दिला म्हणून ते लिहिलं नाही. आता पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोणालाही अटक करण्यात आली नाही. अवघ्या 6 लाखांसाठी घेतला जीव गेल्या वर्षीय काजलचं लग्न संजीत कुमार नावाच्या तरुणासोबत झालं होतं. लग्न झालं तेव्हा संजीत रेल्वेमध्ये चतुर्थवर्ग कर्मचारी होता. नुकतच त्याचं टीटीईमध्ये प्रमोशन झालं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नादरम्यान काजल्याचा नातेवाईकांनी त्याला 12 लाख रुपयांची रोख आणि अन्य सामान भेट म्हणून दिली. मात्र टीटीईमध्ये प्रमोशन झाल्यानंतर सासरकडील मंडळी काजलच्या नातेवाईकांकडून 6 लाख रुपयांची मागणी करू लागले. यानंतर त्यांनी 80 हजार रुपये दिले. मात्र तरीही ते काजलला त्रास देत होते. 17 जुलै रोजी माहेरच्या मंडळींनी शेवटचं काजलशी बोलले. त्यानंतर तिच्याशी त्यांचं बोलणं झालं नाही. तिची मोबाइल सतत बंद होता. 18 जुलै रोजी काजलच्या वडिलांनी तिच्या सासऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वांना मोबाइल बंद होता. यानंतर माहेरच्यांना संशय आला. हे ही वाचा-अल्पवयीन मुलीची प्रसूती आणि बाळांची बोली; रुग्णालयात भरला नवजात बाळांचा बाजार 19 जुलै रोजी काजलचे नातेवाईक तिच्या सासरी आले. मात्र तिच्या सासरी कोणीचं नव्हतं. सर्वजण फरार होते. त्यावेळी तिची हत्या झाल्याची शंका आली. यानंतर त्यांनी पोलिसांना याची सूचना दिली. माहेरच्या मंडळींनी जमिनीत 12 तुकड्यांमध्ये गाडलेला तिचा मृतदेह बाहेर काढला. आणि त्यावर अंत्यसंस्कार केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Marriage, Murder