Home /News /nashik /

सरकारी नोकरी हडपण्यासाठी नाशकातील तरुणानं रचला बनाव; दोन वर्षांनी फुटलं बिंग

सरकारी नोकरी हडपण्यासाठी नाशकातील तरुणानं रचला बनाव; दोन वर्षांनी फुटलं बिंग

Crime in Nashik: बोगस प्रमाणपत्र (bogus certificate) दाखवून सरकारी नोकरी (Government Job) मिळवल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात उघडकीस आला आहे.

    नाशिक, 25 सप्टेंबर: बोगस प्रमाणपत्र (bogus certificate) दाखवून सरकारी नोकरी (Government Job) मिळवल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात उघडकीस आला आहे. आरोपीनं आपण नाशिक जिल्हा संघाकडून खेळलो असल्याची खोटी माहिती सांगून प्रमाणपत्र मिळवलं होतं. त्यानंतर याच प्रमाणपत्राच्या आधारे आरोपीनं सरकारी नोकरी मिळवली होती. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. खऱ्या खेळाडूच्या तक्रारीनंतर आरोपीचं बिंग फुटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तोतया खेळाडूला अटक (One arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करता आहेत. प्रभाकर धोंडिबा गाडेकर असं अटक करण्यात आलेल्या तोतया खेळाडूचं नाव आहे. आरोपी गाडेकर याने 2019 मध्ये अहमदनगरच्या शासकीय कोषागारात सरकारी नोकरी मिळवली होती. त्याला पुण्यातील हिंडवडी येथे अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. आरोपीनं क्रीडा आरक्षणाचा लाभ उठवल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हेही वाचा-6 तासात मिळालं कर्माचं फळ; साखरपुड्याच्या दिवशीच नवरदेवाची पोलिसांकडून उचलबांगडी खरंतर शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण असतं. हे आरक्षण मिळवण्यासाठी अनेकांनी यापूर्वी विविध गैरमार्गाचा अवलंब केल्याचं उघड झालं आहे. आरोपी गाडेकरने देखील अशाच गैरमार्गाचा अवलंब करत 'सेपकटकरा' खेळाच्या नाशिक जिल्हा संघाकडून खेळल्याचं बोगस प्रमाणपत्र मिळवलं होतं. विशेष म्हणजे नाशिकच्या सेपकटकरा जिल्हा संघात फक्त पाच खेळाडू मागील कित्येक वर्षापासून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. हेही वाचा-ऑनलाइन क्लासमध्ये लावला अश्लील VIDEO; लिंकद्वारे घुसखोरी करत 'जेठालाल'चे कृत्य असं असताना दुसरं कोणीतरी आपल्या संघाचं प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरीवर लागल्याचं संबंधित खेळाडूंना समजलं. त्यानंतर संबंधित खेळाडूंनी ही गोष्ट क्रीडा आयुक्तांच्या कानावर घातली. याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर संबंधित कारवाई केली आहे. सेपकटकरा हा दुर्लक्षित क्रीडा प्रकार असून खूप कमी प्रमाणात खेळला जातो. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nashik

    पुढील बातम्या