बेरोजगारीनं झाले त्रस्त, मग बनावट नोटा छापून लाइफ केली मस्त; नाशकात 7 बहाद्दर गजाआड, लाखोंच्या नोटा जप्त

बेरोजगारीनं झाले त्रस्त, मग बनावट नोटा छापून लाइफ केली मस्त; नाशकात 7 बहाद्दर गजाआड, लाखोंच्या नोटा जप्त

Crime in Nashik: लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाल्यानं (Become jobless) नाशकातील सात जणांनी भलताच मार्ग स्विकारला आहे. त्यांनी थेट बनावट नोटा छापण्याचा छापखानाच (fake note printing press) तयार केला होता.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 14 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूने थैमान (Corona pandemic) घातलं आहे. दरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर बऱ्याच जणांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशात लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाल्यानं (Become jobless) नाशकातील सात जणांनी भलताच मार्ग स्विकारला आहे. त्यांनी थेट बनावट नोटा छापण्याचा छापखानाच (fake note printing press) तयार केला होता. मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कारभाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नाशकातून सात जणांना अटक (7 arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात कलर प्रिंटरचा व्यवसाय बंद पडल्यानं आरोपींनी त्याच प्रिंटरचा वापर करत बनावट नोटा छापण्याचा छापखानाच सुरू केला होता. मागील तीन महिन्यांपासून आरोपी हुबेहुब दिसणाऱ्या या बनावट नोटा बाजारात आणत होते. 10-20 रुपयांची खरेदी करून आरोपी या नोटा बाजारात आणत होते. पण आरोपींचा हा गैरप्रकार काही व्यापाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे.

हेही वाचा-...म्हणून पोलीस पती करायचा पत्नीचा छळ; विवाहितेनं गौरी आगमनाच्या दिवशीच दिला जीव

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सापळा रचून सुरगाणा येथून सात आरोपींना अटक केली आहे. संबंधित सर्व आरोपी नाशिक जिल्ह्यातील विविध गावातील रहिवासी आहेत. आरोपींनी लासलगाव जवळील विंचूर याठिकाणी हा छापखाना सुरू केला आहे. या कारवाईत सुरगाणा पोलिसांनी पावणे सात लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त (6.75 lakh worth fake currency seized) केल्या आहे.

हेही वाचा-आजारी मजुराला भेटायला गेला अन् परतलाच नाही; कामगारांनी मालकाचा केला वाईट शेवट

तांत्रिक माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलिसांनी हे बनावट नोटा छापणारं रॅकेट उद्धवस्त केल्यानं गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शिवाय या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा काही हस्तक्षेप आहे का? याचा तपास देखील पोलिसांनी सुरू केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात देखील खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस या घटनेचा तपास करत असून यामध्ये आणखी कोणतं रहस्य समोर येणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Published by: News18 Desk
First published: September 14, 2021, 2:38 PM IST

ताज्या बातम्या