नाशिक, 30 ऑक्टोबर: गंभीर गुन्हा केल्याने बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या चार अल्पवयीन आरोपींनी कर्मचाऱ्याला मारहाण करत (4 accused juvenile beat Employee) सुधारगृहातून पलायन केल्याची (abscond from juvenile detention center) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन आरोपींनी जेवण द्यायला आलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण करून धूम ठोकली आहे. त्यामुळे बालसुधारगृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हा खळबळजनक प्रकार नाशिक जिल्ह्याच्या मनमाड शहरातील बालसुधारगृहात घडला आहे. संबंधित अल्पवयीन आरोपींचा शहरात सर्वत्र शोध घेतला जात आहे. पण अद्याप त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड शहरातील कॅम्प भागात शासकीय बाल सुधार गृह (रिमांड होम) आहे. या बालसुधारगृहात घरातून पळून आलेले निराधार आणि वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभाग आढळून आलेल्या अल्पवयीन गुन्हेगारांना ठेवलं जातं. या बालसुधारगृहात एकूण सतरा मुलं होती. पण अलीकडेच नाशिक येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या तीन अल्पवयीन आरोपींना न्यायालयाच्या आदेशानुसार बाल सुधारगृहात दाखल करण्यात आलं होतं.
हेही वाचा-आधी पार्टी केली मग कुदळ मारून मित्राचा काढला काटा; नागपुरात आणखी एक हत्येचा थरार
दरम्यान, शुक्रवारी रात्री बालसुधारगृहातील कर्मचारी योगेश बोदडे मुलांना जेवण देण्यासाठी गेले. यावेळी बोदडे यांच्यावर नुकतेच दाखल झालेल्या तीन आरोपींनी आणि पूर्वीच्या एका अल्पवयीन मुलाने हल्ला केला. चौघांनी बोदडे यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. यानंतर चारही आरोपींनी बालसुधारगृहाच्या गेटवरून उड्या टाकून पलायन केलं आहे. चार अल्पवयीन मुलांनी नियोजित पद्धतीने कर्मचाऱ्यावर हल्ला करून धूम ठोकल्याने बालसुधारगृह प्रशासन खडबडून जागं झालं आहे.
हेही वाचा-झोपेतच पत्नीला संपवलं;काही तासात भयावह अवस्थेत आढळला पती, जळगावातील खळबळजनक घटना
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी धाव घेत, संपूर्ण प्रकरण जाणून घेतलं आहे. तसेच मनमाड शहरातील बसस्टॉप, रेल्वे स्थानक परिसरात आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं पाठवली आहेत. तसेच एक पोलीस पथक आरोपींच्या शोधासाठी नाशिकला रवाना झालं आहे. संबंधित चारही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.