Home /News /nagpur /

साहेब, तुमचे सीसीटीव्ही बंद आहेत; चोरानेच पोलिसांची केली पोलखोल, नागपूरातील घटना

साहेब, तुमचे सीसीटीव्ही बंद आहेत; चोरानेच पोलिसांची केली पोलखोल, नागपूरातील घटना

Crime in Nagpur: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. एका चोरीच्या गुन्ह्यांत (Theft) अटक केलेल्या संशयित आरोपीनं पोलिसांची पोलखोल केली आहे.

    नागपूर, 24 जुलै: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर (Nagpur) याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. एका चोरीच्या गुन्ह्यांत (Theft) अटक केलेल्या संशयित आरोपीनं पोलिसांची पोलखोल केली आहे. संबंधित चोरट्यानेच रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद (CCTV Cameras are off) असल्याची बाब लक्षात आणून दिली आहे. चोरट्याचा हा दावा ऐकून पोलीस देखील चक्रावले आहेत. पोलीस सध्या संबंधित चोराची कसून चौकशी करत आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. नेमकं प्रकरण काय आहे? खरंतर, काही दिवसांपूर्वी नागपूरातील इतवारी रेल्वे स्थानकावर चाकूचा धाक दाखवत एका प्रवाशाला लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी चोराला शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू केली. तसेच एका संशयित चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संबंधित प्रवाशाला तुच लुटलं असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं पोलिसांनी चोराला सांगितलं. पण चोरानं काही आपला गुन्हा कबुल केला नाही. हेही वाचा-बंदुकीसह सेल्फी घेताना घडला जीवघेणा प्रकार; लग्नाच्या 2 महिन्यात संसार उद्ध्वस्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तुझी चोरी कैद झाल्याचं पोलीस ठासून सांगत राहिले. पण हे शक्यच नाही. कारण गेल्या चार महिन्यांपासून इतवारी रेल्वे स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती संबंधित संशयित चोरट्यानंच पोलिसांना दिली आहे. त्यामुळे चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याच्या पोलिसांच्या दाव्याची चोरानं पोलखोल केली आहे. हेही वाचा-मित्र म्हणून घरी बोलावले, पण 'तो' पत्नीच्या प्रेमात पडला आणि.... चोराच्या या दाव्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. विशेष म्हणजे इतवारी रेल्वे स्टेशनवर एकूण 23 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण हे सर्वच्या सर्व कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे या परिसरात प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले आहे. सीसीटीव्ही फक्त नावापुरते लावले आहेत. रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही लावल्यानं गुन्हेगाराला आपण आरामात पकडू शकतो या भ्रमात राहणाऱ्या पोलिसांची चोरानं पोलखोल केली आहे. याप्रकरणी पोलीस सध्या संशयित आरोपीची कसून चौकशी करत आहेत. मात्र कोणताही पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur, Theft

    पुढील बातम्या