हरदोई, 23 जुलै : उत्तर प्रदेशातील हरदोई येथील शाहाबाद पोलीस ठाणे हद्दीतील नव विवाहितेचा (Newly weds) बंदुकीसोबत सेल्फी घेताना मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दुसरीकडे मृत तरुणीचे वडील राकेश कुमार यांनी मुलीचे पती आकाश आणि सासु-सासरे यांच्या विरोधात हुंड्यासाठी 2 लाख रुपये मागून अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणावर पोलिसांचा तपास सुरू आहे. (Shocking news that a newly weds died while taking a selfie with a gun)
आकाश गुप्ता याचं लग्न राधिका हिच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी झालं होतं. साधारण 2 वाजेदरम्यान राधिका बंदुकीसह सेल्फी घेत असताना अचानक गोळी झाडली गेली आणि यात राधिकाचा मृत्यू झाला. यानंतर तातडीने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. बंदुकीची गोळी राधिकाच्या गळ्याच्या आरपार गेली. पोलिसांनीह या प्रकरणाची सूचना देण्यात आली. अधिक तपासासाठी पोलिसांनी राधिकाचा मोबाइल जप्त केला आहे. यानंतर राधिकाचे माहेरील मंडळीदेखील दाखल झाली. त्यांनी राधिकाच्या सासरच्या मंडळींवर तिच्या हत्येचा आरोप केला आहे. राधिकाच्या सासरची मंडळी 2 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तिच्यावर अत्याचार करीत होते. त्यामुळे त्यांनीच गोळी घालून तिची हत्या केल्याचा आरोप राधिकाच्या वडिलांनी केला आहे.
हे ही वाचा-डिप्रेशनमधील तरुणींना पैशाचं आमिष देत मागायचा न्यूड फोटो; अशी झाली पोलखोल
एका तासापूर्वीच आणली होती बंदुक
पती-पत्नी बंदुक हातात धरून सेल्फी घेत असताना ही घटना घडली. मात्र या प्रकरणात FIR देखील दाखल केला असून या प्रकरणाचा सविस्तर तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.