• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मित्र म्हणून घरी बोलावले, पण 'तो' पत्नीच्या प्रेमात पडला आणि....

मित्र म्हणून घरी बोलावले, पण 'तो' पत्नीच्या प्रेमात पडला आणि....

मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रबाळे इथं एकाच ठिकाणी कामाला होते. याच दरम्यान दोघांचं एकमेकांच्या घरी येणे जाणे होते.

 • Share this:
  नवी मुंबई, 23 जुलै : एकतर्फी प्रेमातून (one sided love) एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील रबाळे (navi mumbai rabale) इथं घडली आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोठा शिताफीने बंगालहून पाठलाग करत आरोपीला अटक केली आहे. नवी मुंबई  पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रबाळे इथं एकाच ठिकाणी कामाला होते. याच दरम्यान दोघांचं एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. याच दरम्यान आरोपीचे मृत मित्राच्या पत्नीवर प्रेम जडले. त्यामुळे प्रेमात अडथळा येत असल्यामुळे आपल्याच मित्राचा काटा काढला. Weather Alert : कोकण-मध्य महाराष्ट्रात पुढील 3 दिवस धोक्याचे, अतिवृष्टीचा इशारा 19 जून रोजी मृत तरुणाच्या पत्नीने पोलिसांत पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मृत तरुणाच्या भाऊ सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याने माहिती दिली की, रबाळे इथं एका दुकानाबाहेर भावाची चप्पल आढळून आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दुकानाचे शटर उघडले असता बाथरूमध्ये मृतदेह आढळून आला. सोसायटीत एक रुग्ण आढळला तरी होणार सगळ्याची कोरोना टेस्ट त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार केलं. मृत तरुणासोबत  काम करत असणाऱ्या तरुणांची माहिती गोळा केली. त्यावरून एक संशयित आरोपी हा उत्तर प्रदेश इथं राहणार होता. तो बेपत्ता असल्याचे समोर आलं. तसंच तो बंगाली भाषेत बोलत असल्याची माहिती काही जणांनी दिली. त्यावरून पोलिसांना संशय बळावला आणि त्यानंतर पोलिसांनी एक टीम पश्चिम बंगालमध्ये पाठवली. तिथे पोहोचल्यावर पोलिसांना कळाले की आरोपी पुन्हा मुंबईला जात असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांना बंगालहून पाठलाग सुरू केला. अखेर इगतपुरी रेल्वे स्टेशनवर आरोपीला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींने खूनाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: