जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / '...तर तुला जिवंत सोडणार नाही', अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तरुणाचं विकृत कृत्य

'...तर तुला जिवंत सोडणार नाही', अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तरुणाचं विकृत कृत्य

Representative Image

Representative Image

Crime in Jalgaon: जळगावातील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून (One sided love) अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून तिच्याशी अश्लील कृत्य केलं आहे. आरोपीने पीडितेला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी (minor girl abused and threat to death) देखील दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 30 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर येत असताना, या यादीत आणखी एका घटनेची भर पडली आहे. जळगावातील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून (One sided love) अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून तिच्याशी अश्लील कृत्य केलं आहे. आरोपीने पीडितेला शिवीगाळ करत तिला जिवे मारण्याची धमकी (minor girl abused and threat to death) देखील दिली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कुलदीप रवींद्र सपकाळे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचं नाव असून तो धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलदीप हा गेल्या काही दिवसांपासून गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. एकतर्फी प्रेमातून तो पीडित मुलीचा अनेकदा पाठलाग करायचा. हेही वाचा- आधी झोपेच्या गोळ्या दिल्या मग पेट्रोल ओतून पेटवलं!गर्लफ्रेंडने दिला क्रूर मृत्यू दरम्यान, गुरुवारी पीडित मुलगी आपल्या एका मैत्रिणीसोबत कामानिमित्त बाहेर गेली होती. दोन्ही मुली अग्रवाल चौकातून जात असताना, आरोपी कुलदीपने पाठलाग करत पीडित मुलीला भररस्त्यात आडवलं. यावेळी आरोपीनं ‘तू फक्त माझी आहेस, आणि तू माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशा शब्दांत आरोपीनं पीडित मुलीला धमकी दिली आहे. यावेळी आरोपी पीडित मुलीच्या मैत्रिणीला देखील अश्लील शिवीगाळ केली आहे. तसेच दोघींना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. हेही वाचा- फेसबुकवरील मैत्री जीवावर बेतली; तरुणाच्या आत्महत्येनं झाला लव्ह स्टोरी The End ही घटना घडताच पीडित मुलीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात