गळफास घेतलेल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून आणलं परत; 3 दिवसांनी शुद्धीवर येताच अश्रूंचा फुटला बांध

गळफास घेतलेल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून आणलं परत; 3 दिवसांनी शुद्धीवर येताच अश्रूंचा फुटला बांध

नागपुरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेनं गळफास घेतलेल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून (Wife saved husband's life) परत आणलं आहे.

  • Share this:

नागपूर, 31 ऑक्टोबर: नागपुरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेनं गळफास घेतलेल्या पतीला मृत्यूच्या दाढेतून (Wife saved husband's life) परत आणलं आहे. गळफास घेतल्यानंतर पती शेवटचे आचके देत असल्याचं पाहून पत्नीची घाबरगुंडी उडाली. पण तिने प्रसंगावधान दाखवत क्षणाचाही विलंब न करता, पतीचे पाय वर उचलून धरले. हे दृश्य शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं पाहिलं आणि तिने मदतीला अन्य लोकांना बोलावलं. पत्नीच्या प्रसंगावधानामुळे पतीचा जीव वाचला आहे.

तीन दिवस कोमात राहिल्यानंतर, शुद्धीवर आलेल्या पतीला पाहून पत्नीला आपले अश्रू थांबवता येत नव्हते. संबंधित 38 वर्षीय महिला गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात आपल्या पतीच्या शेजारीच बसली होती. पती शुद्धीवर येताच तिचा आनंद गगनात मावत नव्हता. तिला बराच वेळ आनंदाश्रू रोखता येत नव्हते. हॉस्पिटलमधील हे दृश्य पाहून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे डोळे देखील पाणावले होते.

हेही वाचा-आधी कट मारला मग फरफटत नेत ST चालकाला चिरडलं; नाशकात कंटेनर चालकाचं निर्दयी कृत्य

नेमकं काय घडलं?

38 वर्षीय महिलेचा पती खचून गेला होता. 25 ऑक्टोबर रोजी त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संबंधित पतीने स्टूलवर चढत घरातील पंख्याला दोरी बांधली आणि फास आपल्या गळ्यात लटकवला. यानंतर त्याने गळफास घेण्यासाठी पायाखालचा स्टूल पाडला. स्टूल पडल्याचा आवाज आल्याने पत्नीने घरात डोकावून पाहिलं. यावेळी घरातील दृश्य पाहून तिचा थरकाप उडाला. काही वेळासाठी घाबरलेल्या महिलेनं प्रसंगावधान राखत पतीच्या दिशेनं धाव घेतली.

हेही वाचा-दुहेरी हत्याकांडाने सांगली हादरली; बापाचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला राक्षस

क्षणाचाही विलंब न करता तिने आपली सर्व ताकद लावून पतीचे पाय वर उचलून धरले. हे दृश्य एका शेजारील महिलेनं पाहिलं आणि तिने काही जणांना मदतीसाठी बोलावलं. शेजाऱ्यांनी कोमात गेलेल्या पतीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी तीन दिवस आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर पतीला शुद्ध आली आहे. पतीला शुद्धीवर आल्याचं पाहून पत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता. तिला तिचे आनंदाश्रू रोखता येत नव्हते. संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर असून त्यामध्ये सुधार होतं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: October 31, 2021, 10:32 AM IST

ताज्या बातम्या