पुण्याहून घरी परतणाऱ्या कामगारावर काळाचा घाला, वाशिम जिल्ह्यात बसचा अपघात

पुण्याहून घरी परतणाऱ्या कामगारावर काळाचा घाला, वाशिम जिल्ह्यात बसचा अपघात

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर- मुंबई (Nagpur- Mumbai) द्रुतगती मार्गावर लक्झरी बस उलटून अपघात (luxury bus accident) झाला.

  • Share this:

वाशिम, 11 जून :  वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर- मुंबई (Nagpur- Mumbai) द्रुतगती मार्गावर लक्झरी बस उलटून अपघात (luxury bus accident) झाला. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर 20 जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील चांडस जवळ ही घटना घडली. बस चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटल्याची माहिती आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून यवतमाळ जिल्ह्यातील पुसदकडे जाणारी एम एच 29 एम 8282 क्रमांकाची लक्झरी बस चांडस जवळ उलटली. या अपघातामध्ये 25 वर्षांच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवाशी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील वानखडे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

धक्कादायक! खंडणीत केली मुंडक्याची मागणी, अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या

या अपघातमधील जखमींना मालेगाव आणि वाशिम  येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तसेच, रस्त्यावर उलटलेली बस हटविण्यात आली आहे. या बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे पुसद भागातील कामगार होते. पुण्याहून घरी परतत असताना हा अपघात झाला.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 2:53 PM IST

ताज्या बातम्या