धक्कादायक! खंडणीत केली मुंडक्याची मागणी, अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या

धक्कादायक! खंडणीत केली मुंडक्याची मागणी, अपहरण करुन 15 वर्षांच्या मुलाची हत्या

Nagpur breaking News: नागपूरमध्ये (Nagpur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण करुन हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

नागपूर, 11 जून: नागपूरमध्ये (Nagpur Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण करुन हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राज पांडे असं या मृत मुलाचं नाव आहे. आरोपीनं हत्या करुन रिंगरोड परिसरात राज याचा मृतदेह फेकला होता. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. (Nagpur 15 year old boy kidnapped and murdered Accused arrested)

नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये ही घटना घडली आहे. सुरज शाहू असं आरोपीचं नाव आहे. आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी आरोपी सुरजनं हे पाऊल उचलल्याचं समजतंय. सध्या आरोपी सुरज शाहू एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

हेही वाचा- Mumbai Rain Updates: मुंबईच्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स, फक्त एका क्लिकवर

सुरजनं गुरुवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास राज याचं अपहरण केलं होतं. खंडणी म्हणून आरोपीनं शोषण करणाऱ्या मृत राज याच्या काकांच्या मुंडक्याची धक्कादायक मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यानं आरोपीनं मुलाची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Published by: Pooja Vichare
First published: June 11, 2021, 8:58 AM IST

ताज्या बातम्या