नागपूर, 16 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यात (Dussehra rally) उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेशी बेईमानी करत शिवसेना, ठाकरे सत्तेत आले आहेत. मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि ती लपून राहिलेली नाहीये असं फडणवीसांनी म्हटलं आहे. यासोबतच महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर असल्याचा गंभीर आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (some ministers using vasuli software, serious allegation of Devendra Fadnavis)
काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर
देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, आयटी विभागाच्या छापेमारीतून जे त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला झोपच यायला नको. राज्यात इतकी प्रचंड दलाली सुरू आहे... खरं म्हणजे ही दलाली इतक्या स्तरावर पोहोचली आहे की, काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर (Vasuli software) तयार केलं आहे असं आयटीच्या छापेमारीत लक्षात येत आहे. हे महाराष्ट्रात सुरू असेल तर ईडी, सीबीआय राज्यात येणारच.
LIVE | Media interaction, #Nagpur https://t.co/SFRpUekZ0V
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2021
जनतेशी बेईमानी करुन सत्तेत
देवेंद्र फडणवीसांनी पुढे म्हटलं, मुख्यमंत्रिपदी असल्याने ठाकरे विसरले, जनतेने भाजपला नाकारलं नाही. जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले. जनतेशी बेईमानी करुन तुम्ही सत्तेत आलात. जनतेशी बेईमानी करत शिवसेना, ठाकरे सत्तेत आहे. मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती, मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा लपून राहिलेली नाही. मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा पूर्ण झाली आम्हाला दोष देऊ नका.
वाचा : "आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत" नितेश राणेंचा खोचक टोला
एकूणच कालच्या मेळाव्यात ना विचार होतं, ना सोनं होतं. कालच्या मेळाव्यात केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्टेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतं. असंगाशी संग केला तर अशाच प्रकारचं फ्रस्टेशन होईल आणि शाच प्रकारचं वक्तव्य निघेल. मी केवळ इतकंच सांगतो भाजपला नामोहरण करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही सत्ता वापरील, पैसा वापरली तरी देखील नंबर एकचा पक्ष भाजपच होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सीजच्या विरोधात
ईडी, सीबीआय याचं भय कुणाला असेल? ज्याने काही केलं असेल त्याला भय असेल. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एजन्सीजच्या वापराच्या विरोधात आहेत. ते कधीही एजन्सीजचा गैरवापर करु देत नाहीत. एजन्सीच्या कामात ते मध्ये येत नाही आणि वापरही करत नाहीत. अन्यथा एजन्सीचा वापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये असतं. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोकं आहोत असं फडणवीसांनी म्हटलं.
गेल्या काळात काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी एजन्सीजचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही, आमचे नेतेही करणार नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे भ्रष्टाचार खनुन काढल्याशिवाय मोदीजी स्वस्थ बसणार नाहीत. जे भ्रष्टाचारी असतील त्यांनी घाबरायचं आणि जे भ्रष्टाचारी नसतील त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.