बेपत्ता वडिलांची तक्रार द्यायला गेला अन् समोरच दिसला मृतदेह; नागपुरातील हृदय हेलावणारी घटना

बेपत्ता वडिलांची तक्रार द्यायला गेला अन् समोरच दिसला मृतदेह; नागपुरातील हृदय हेलावणारी घटना

Crime in Nagpur: बेपत्ता वडिलांची पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागपुरातील एका तरुणाला आपल्या वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ आली आहे.

  • Share this:

नागपूर, 27 ऑक्टोबर: नागपुरातील बेलतरोडी परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाचे वडील गेल्या काही तासांपासून बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशीही वडील घरी न आल्याने संबंधित तरुण वडील बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार देण्यासाठी (went to file missing complaint) गेला होता. दरम्यान तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला असता, त्याठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या वडिलांचा मृतदेह त्याला दिसला (See father's dead body) आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बेपत्ता झालेल्या 53 वर्षीय व्यक्तीचं नाव अरुण घरडे असून ते वाहन चालक होते. सोमवारी रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही ते परत आले नाहीत. दरम्यान बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपुरच्या आऊटर रिंग रोड परिसरात घरडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. याठिकाणी झाडीत अनेक ठिकाणी रक्ताचे डाग देखील आढळून आले होते.

हेही वाचा-चिमुकलीला पेरूच्या बागेत नेलं अन्..; 67 वर्षीय नराधमाच्या कृत्याने पुणे हादरलं!

पोलिसांनी अरुण घरडे यांचा मृतदेह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात घेऊन आले होते. तसेच मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. दरम्यान पोलीस ठाण्यात घरडे यांचा मुलगा वडील बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला आला होता. पण मुलाने वडिलांचं सांगितलेलं वर्णन मृत व्यक्तीशी जुळत असल्याने पोलिसांनी मुलाला मृतदेह दाखवला. तेव्हा मुलाने मृतदेहाची ओळख पटवून ते आपले वडिलच असल्याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा-ठाणे: दहावीच्या 2 तुकड्या आपसात भिडल्या; भांडणात एकाची छातीत चाकू भोकसून हत्या

वडिलांना दारुचं व्यसन असल्याची माहिती देखील मुलानं पोलिसांना दिली आहे. नागपुरच्या आऊटर रिंग रोड परिसरातील एका झुडपात संदिग्धावस्थेत मृतदेह आढळल्याने त्यांची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. बेलतरोडी पोलीस याच दिशेनं घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: October 27, 2021, 1:22 PM IST

ताज्या बातम्या