मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: विरारमध्ये 50 वर्षीय इसमाला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

VIDEO: विरारमध्ये 50 वर्षीय इसमाला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Caught on camera: विरारमध्ये एका इसमावर तिघांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला.

Caught on camera: विरारमध्ये एका इसमावर तिघांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला.

Caught on camera: विरारमध्ये एका इसमावर तिघांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला.

विरार, 26 मे: मुंबईच्या शेजारी असलेल्या विरार (Virar)मध्ये एका इसमावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. तिघांच्या टोळक्याने एका 50 वर्षीय इसमाला दगडाने ठेचून मारण्याचा (3 youths attacked on man with stone) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना विरार पूर्व येथील मनवेल पाडा (Manvel Pada, Virar) परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्व मनवेल पाडा परिसरात राहणाऱ्या अमित चौधरी यांच्यावर 22 मे 2021 रोजी प्राणघातक हल्ला झाला. तीन तरुणांच्या टोळक्याने हा हल्ला केला. अमित हे आपल्या सोसायटीच्या आवारात उभे असताना 3 तरुण दुचाकीवरुन आले आणि त्यांच्यावर हल्ला केला.

लज्जास्पद! मृत मुलाला जिवंत करण्यासाठी दबाव; विद्यार्थिनींना चेटकीण म्हणत गावात अर्धनग्न करून बेदम मारहाण

ही संपूर्ण घटना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात दिसत आहे की तीन तरुण अमित चौधरी यांच्यावर हल्ला करत आहेत. तर एक तरुण हा आपल्या हातात दगड घेऊन अमित चौधरी यांच्या अंगावर फेकत आहे. अमित यांच्या सोसायटीतील नागरिकांनी हा प्रकार पाहिला असता त्यांनी मध्यस्थी करुन सर्व प्रकार थांबवला.

या घटनेत अमित चौधरी यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी विरारमधील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विरार पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Cctv footage, Crime, Virar