Home /News /nagpur /

Nagpur News: अल्पवयीन मुलीसोबत प्राचार्याचं विकृत्य कृत्य; पीडितेच्या घरात शिरून विनयभंग

Nagpur News: अल्पवयीन मुलीसोबत प्राचार्याचं विकृत्य कृत्य; पीडितेच्या घरात शिरून विनयभंग

Crime in Nagpur: नागपूर जिल्ह्यातील सावनेर याठिकाणी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानं दारुच्या नशेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    नागपूर, 24 जुलै: नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील सावनेर (Savner) याठिकाणी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानं (Principal) दारुच्या नशेत अल्पवयीन मुलीचा (Minor Girl) विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर पीडित मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांना देखील दमदाटी करण्याचा प्रयत्न आरोपी प्राचार्यानं केला आहे. रात्री उशीरा पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्राचार्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. वीरेंद्र केशव जुमडे असं अटक केलेल्या 55 वर्षीय आरोपी प्राचार्याचं नाव आहे. तो नागपूर शहरातील गणेश पेठ परिसरातील मॉडेल मील येथील रहिवासी आहे. आरोपी जुमडे हे सावनेर शहरातील डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीनं दारुच्या नशेत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा-साहेब, तुमचे सीसीटीव्ही बंद आहेत; चोरानेच पोलिसांची केली पोलखोल, नागपूरातील घटना पीडित मुलगी ही  डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या शेतातील घरात राहते. हे शेत जगदीश सावजी यांच्या मालकीचं आहे. पीडित मुलीचे आईवडिल या शेतात कामाला आहेत. लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित मुलगी आपल्या घराच टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी आरोपी प्राचार्य दारुच्या नशेत तिच्या घरी गेला. यावेळी आरोपी प्राचार्यानं हाफ पँट घातली होती. त्यानं पीडितेच्या घरात घुसून तिच्यासोबत अश्लील चाळे करायला सुरुवात केली. पण पीडित मुलीनं प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केला. हेही वाचा-धक्कादायक! नागपुरात तरुणांचा दारू पिऊन राडा; विरोध करणाऱ्यावर थेट गोळ्या झाडल्या मुलीचा आवाज ऐकून शेतीचे मालक जगदीश सावजी आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दारुच्या नशेत असणारे प्राचार्य जुमडे यांनी नागरिकांना दमदाटी करून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या आईवडिलांनी रात्री नऊच्या सुमारास पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यांत आरोपी प्राचार्य वीरेंद्र जुमडे याला गुरुवारी रात्री उशीरा अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनाली रासकर करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur, Sexual harassment

    पुढील बातम्या