Home /News /nagpur /

धक्कादायक! नागपुरात तरुणांचा दारू पिऊन राडा; विरोध करणाऱ्यावर थेट गोळ्या झाडल्या

धक्कादायक! नागपुरात तरुणांचा दारू पिऊन राडा; विरोध करणाऱ्यावर थेट गोळ्या झाडल्या

Crime in Nagpur: दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना विरोध केल्यानं एका तरुणावर गावठी बंदुकीतून चार गोळ्या झाडल्याचा (Gun firing) धक्कादायक प्रकार नागपूरात उघडकीस आला आहे.

    नागपूर, 24 जुलै: दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना विरोध केल्यानं एका तरुणावर गावठी बंदुकीतून चार गोळ्या झाडल्याचा (Gun firing) धक्कादायक प्रकार नागपूरात (Nagpur) उघडकीस आला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दारुडे नशेत असल्यानं त्यांचा नेम चुकला त्यामुळे संबंधित युवकाचा जीव वाचला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्री उशीर सहा आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना नागपूरातील गोवा कॉलनी परिसरात घडली आहे. याठिकाणी ठेला लावून काम करणारे काही तरुण गप्पा मारत बसले होते. दरम्यान त्याठिकाणी दोन दारुडे मद्यधुंद अवस्थेत त्याठिकाणी आले. संबंधित दारुड्यांनी काहीही कारण नसताना, गप्पा मारत बसलेल्या तरुणांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे गप्पा मारत बसलेल्या एका तरुणानं त्यांना हटकलं. पण दारुड्यांनी शिवीगाळ सुरुच ठेवली. यामुळे संतापलेल्या युवकानं एका दारुड्या तरुणाच्या कानशिलात लगावली. हेही वाचा-आईसमोर वाईट बोलल्यानं तरुणाची सटकली; भररस्त्यात मित्राची चाकू भोकसून हत्या कानशिलात लगावल्यानंतर, संबंधित दारुडा आपल्या मित्राला घेऊन घटनास्थळावरून निघून गेला. पण थोड्याच वेळात तो आपल्या काही मित्रांना घेऊन त्याच ठिकाणी आला आणि पुन्हा शिवीगाळ सुरू केली. तसेच कानशिलात लगावणाऱ्या तरुणाला शोधायला सुरुवात केली. संबंधित तरुण पुढे येताच आरोपी दारुड्यानं तरुणाच्या दिशेनं गावठी बंदुकीतून गोळीबार केला. आरोपीनं तरुणाच्या दिशेनं चार गोळ्या झाडल्या. पण आरोपीचा नेम चुकल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. कुणीही जखमी झालं नाही. हेही वाचा-बंदुकीसह सेल्फी घेताना घडला जीवघेणा प्रकार; लग्नाच्या 2 महिन्यात संसार उद्ध्वस्त पण गोळीबार केल्याचा आवाज आल्यानं परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांना येत असल्याच पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत, संबंधित सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कोणतही कारण नसताना, तरुणांनी केलेल्या गोळीबारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सर्व शस्त्रे जमा केली आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Gun firing, Nagpur

    पुढील बातम्या