मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा कहर! कोकण, कोल्हापूर नंतर आता नागपुरात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा कहर! कोकण, कोल्हापूर नंतर आता नागपुरात मुसळधार पाऊस

Heavy rain starts in Nagpur: नागपुरात गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस पडत आहे.

Heavy rain starts in Nagpur: नागपुरात गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस पडत आहे.

Heavy rain starts in Nagpur: नागपुरात गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस पडत आहे.

  • Published by:  Sunil Desale

नागपूर, 22 जुलै: महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy rain) पडत आहे. या मुसळधार पावसामुळे कोकणात अक्षरश: पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातही (Kolhapur district) अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. जोरदार बरसत असलेल्या पावसाने आता विदर्भाकडे कूच केल्याचं दिसत आहे. कारण गेल्या तासाभरापासून नागपुरात मुसळधार पाऊस (Heavy rain starts in Nagpur) पडत आहे.

नागपुरमध्ये मागील एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पुढील 48 तासांत नागपूर जिल्ह्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा नागपूर वेध शाळेने दिला आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कोकणात मुसळधार पावसाने हाहाकार

कोकणात परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ट नदीला पूर आल्याने संपूर्ण पाणी शहरात शिरले आहे. शहरातली सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी शिरल्याचं पहायला मिळत आहे.

VIDEO: उल्हास नदी शेजारील बंगले पाण्यात बुडाले, बचाव आणि मदतकार्य सुरू

अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. घरे तसेच इमारतींचे तळमजले हे संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पहायला मिळत आहे. चिपळुणात जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत त्यामुळे मदतीचे मार्गही बंद झाले आहेत. 2005 नंतर प्रथमच अशा प्रकारे चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे.

LIVE VIDEO: मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात तरुण गेला वाहून

बचावासाठी हेलिकाँप्टरची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरपरीस्थितीचा घेतला आढावा. रायगड, रत्नागिरी, सिधुदूर्गचे जिल्हाधिकारी कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिधुदूर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री आदीची तटकरे यांच्याशी केली चर्चा. तात्काळ आपतकालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे दिले आदेश. पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढन्यासाठी अतीरीक्त बोटी तात्काळ पोहवण्याचेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

First published:

Tags: Nagpur, Rain