यवतमाळ, 22 जुलै: राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस (Heavy rain) पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत (rivers overflow) तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण (Flood) झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून (Youth washed away) गेल्याची घटना समोर आली आहे. हा तरुण वाहून जात असतानाची घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने हा तरुण बचावला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यांतील कुपटी येथील विजय येलुतवाड हा तरुण दहगाव नाल्यात वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली. त्या अनुषंगाने तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी तात्काळ शोध मोहीम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. सदर तरुण हा नाला पार करत असताना वाहून गेला. काही लोकांच्या समक्ष हा प्रकार घडला.
मुसळधार पावसाच्या पाण्यात तरुण गेला वाहून pic.twitter.com/TtWfMCX9L1
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2021
देव तारी त्याला कोण मारी विजय येलुतवाड हा तरुण प्रकृती ठीक नसल्या कारणाने रुग्णालयात जाण्यासाठी दाहगाव येथे नाला ओलांडून जात होता त्याच दरम्यान पुराच्या पाण्यात तो वाहून गेला. हा तरुण काही अंतरावर वाहून गेल्या नंतर त्याने एका झाडाला पकडले. बराचवेळ तो त्याच झाडाला पकडून होता. बचाव पथकाने त्याला पाहून तात्काळ सुरक्षितरित्या बाहेर काढले. VIDEO: उल्हास नदी शेजारील बंगले पाण्यात बुडाले, बचाव आणि मदतकार्य सुरू कोकणात मुसळधार पावसाने हाहाकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरपरीस्थितीचा घेतला आढावा. रायगड, रत्नागिरी, सिधुदूर्गचे जिल्हाधिकारी कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिधुदूर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री आदीची तटकरे यांच्याशी केली चर्चा. तात्काळ आपतकालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे दिले आदेश. पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढन्यासाठी अतीरीक्त बोटी तात्काळ पोहवण्याचेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.