बदलापूर, 22 जुलै: ठाणे जिल्ह्यासह (Thane district) संपूर्ण कोकणात (Konkan), कोल्हापूर (Kolhapur), साताऱ्यात मुसळधार पावसामुळे (Heavy rainfall) नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. धरण सुद्धा भरले असून परिणामी अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. उल्हास नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली असून बदलापूर (Badlapur) परिसरात तसेच उल्हास नदीच्या शेजारील परिसर संपूर्णत: जलमय झाला आहे. इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांना इमारतीतून बाहेर काढण्याचे काम सुरू असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
उल्हास नदीच्या शेजारी असलेले अनेक बंगले सध्या पाण्याखाली आहेत या बंगल्यांमध्ये अनेक नागरिक अडकले आहेत. सध्या या नागरिकांना रबर बोटीच्या माध्यमातून बदलापूर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. सध्या बदलापूर अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी असून येथे अडकलेल्या नागरिकांना जेवणाची सोय देखील करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या उल्हास नदीची पाणी पातळी ही धोकादायक स्थितीत असून नागरिकांना सतर्कतेचा आवाहन प्रशासनाने केला आहे.
VIDEO: उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली; नदी शेजारील बंगले पाण्यात बुडाले, pic.twitter.com/sXHOyh0uwW
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2021
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीजवळील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. गणेश नगर, चर्च, मानव पार्क रमेश वाडी आणि आजूबाजूचा परिसर परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे.
मध्यरात्रीच घरांमध्ये पाणी शिरले, त्यानंतर अनेकांनी आपली घरं सोडत दुसरीकडे आसरा घेतलाय. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर सुद्धा झाला आहे. टिटवाळा पूर्व रेल्वे स्थानका बाहेरील सखल भागतील चाळीत रहाणारे 500 हून अधिक घरे पाण्याखाली गेली होती. त्यात वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्यामुळे अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागला. बचाव कार्य अंधारात सुरू होते. पाण्याच्या प्रवाहामुळे मदतकार्यातही अनेक अडचणी येत होत्या. पहाटेच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्याने आता कुठे नागरिकांना थोडा दिलासा मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Mumbai, Rain