जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / नागपुरात भांडण सोडवण्यासाठी जाणं आलं अंगाशी, वीटनं हल्ला करत केली हत्या

नागपुरात भांडण सोडवण्यासाठी जाणं आलं अंगाशी, वीटनं हल्ला करत केली हत्या

नागपुरात भांडण सोडवण्यासाठी जाणं आलं अंगाशी, वीटनं हल्ला करत केली हत्या

Nagpur Crime News: राज्याची राजधानी नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 12 ऑगस्ट: राज्याची राजधानी नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेनं नागपूर चांगलंचं हादरलं आहे. बुधवारी ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या एका तरुणाची हत्या केली आहे. ज्या दोघांमध्ये भांडण सुरु होतं. त्यापैकी एकानं हे कृत्य केलं आहे. (Nagpur Crime News) समोर आलेल्या माहितीनुसार, प्रवीण कथाने असं मृत तरुणाचं नाव आहे. मृत हा परसोडी येथील राहणारा होता. तर आरोपी आशिष सुरेश हा स्थानिक नागरिक आहे.  आशिष हा बांधकाम कामगार आहे. आशिषनं साहिल धमके (वाद झालेला दुसरा व्यक्ती) याच्याकडे आपल्या कामाचे पैसे मागितले. मात्र यावेळी आशिष आणि साहिल यांच्यात वाद झाला. वाद सोडवण्यासाठी गेला प्रवीण आशिष आणि साहिल यांच्यात कामाच्या पैशांवरुन वाद झाला. याचवेळी प्रवीण दोघांमधील वाद सोडवण्यास गेला होता. प्रवीण भांडण सोडवण्यासाठी आल्यानं आशिष याला राग आला. रागाच्या भरात आरोपी आशिषनं प्रवीणवर वीट हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला प्रवीणचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी आशिषला अटक करण्यात आली आहे. अबब! लाचखोर महिला शिक्षणाधिकाऱ्याची संपत्ती ऐकून व्हाल अवाक   ‘फ्रेंडशिप डे’ दिवशी 6 जणांनी जीवलग मित्राचा केला गेम ‘फ्रेंडशिप डे’च्या (Friendship Day) दिवशी झालेल्या वादातून 6 जणांनी आपल्या जीवलग मित्राची निर्घृण हत्या (Friends Brutal Murder) केली. ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर, आरोपींनी काल रात्री नियोजनपूर्व पद्धतीनं काटा काढला. आरोपींनी नागपूरातील हिवरी नगर भागात तरुणाला बोलवून त्याच्यावर घातक हल्ला (Attack on friend) केला. यानंतर आरोपींनी दुखापत झाल्याचं बनाव रचत त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तत्पूर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती. मुंबईतल्या केईएम रुग्णालयात पहिल्यांदाच हात दानाची नोंद अनिकेत भोतमांगे असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव असून तो विंडो फ्रेमिंगचं काम करायचा. दरम्यान फ्रेंडशिप डेच्या दिवशी अनिकेतचा त्याच्या अन्य सहा मित्रांसोसबत किरकोळ कारणातून वाद झाला होता. या झालेल्या वादाचा राग मनात धरून संबंधित सहा मित्रांनी अनिकेतच्या हत्येचा कट रचला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात