मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई अवयवदान: 2016 ला परवाना मिळाल्यानंतर पहिल्यांदाच KEM रुग्णालयात हातदान, ब्रेन डेथ तरुणाच्या कुटुंबियांचा निर्णय

मुंबई अवयवदान: 2016 ला परवाना मिळाल्यानंतर पहिल्यांदाच KEM रुग्णालयात हातदान, ब्रेन डेथ तरुणाच्या कुटुंबियांचा निर्णय

मुंबईत पहिल्यांदाच हातदान

मुंबईत पहिल्यांदाच हातदान

मुंबईत (Mumbai) पहिल्यांदाच हातदान (hand donation) केल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालयात (KEM Hospital ) याची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 12 ऑगस्ट: मुंबईत (Mumbai) पहिल्यांदाच हातदान (hand donation) केल्याची नोंद झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालयात (KEM Hospital ) याची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. 2016 पासून हाताचं प्रत्यारोपण करण्याचा परवाना रुग्णालयाकडे आहे. आता ब्रेन डेथ ग्रस्त (suffered brain death) असलेल्या एका तरुणाच्या कुटुंबियांनी सर्व अवयव दान करण्यास सहमती दर्शवली. यात कुटुंबियांनी तरुणाचे दोन्ही हातही दान केलेत.

तरुणाच्या कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास पाच जणांचं प्राण वाचलेत. या अवयव दानामुळे मुंबईतल्या केईएम रुग्णालयात पहिल्यादा हात दान झाले आहे.

परळच्या केईएम रुग्णालयात एका व्यक्तीनं (अवयन दान केलेले कुटुंबियांना दान केलेल्याचं नाव आणि लिंग सांगू इच्छित नव्हते.) स्वतःचे दोन्ही हात दान केले. हाताचं प्रत्यारोपण करण्यासाठी जवळपास 18-24 तास लागतात. या प्रत्यारोपणात दोन मुख्य धमन्या, सहा शिरा, आठ नसा आणि 12 टेंडन्स आणि हाडे जोडली जातात.

किन्नौर Landslide; 13 जणांचे मृतदेह सापडले, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

मुंबई लोकल ट्रेनमधून पडलेल्या मोनिका मोरेच्या दोन्ही हाताचं गेल्या वर्षी पहिल्यांदा मुंबईत प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. मोनिकासाठी चेन्नई ग्लोबल रुग्णालयातून हाताच्या अवयवयाची मदत झाली होती.

अवयवदानाच्या या कार्यक्रमात मुंबईत गेल्या 24 वर्षात शेकडो मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत आणि हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. मात्र हात दानाची पहिली यशस्वी नोंद आहे.

First published:

Tags: Mumbai, Organ donation