मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

Nagpur: वाढदिवसाच्या पार्टीत दोन गटांत तुफान हाणामारी, तरुणीचा विनयभंग तर तरुणाच्या हत्येचा प्रयत्न

Nagpur: वाढदिवसाच्या पार्टीत दोन गटांत तुफान हाणामारी, तरुणीचा विनयभंग तर तरुणाच्या हत्येचा प्रयत्न

नागपुरात वाढदिवसाच्या पार्टीत दोन गटांत तुफान राडा, तरुणीचा विनयभंग तर एकावर जीवघेणा हल्ला (प्रातिनिधिक फोटो)

नागपुरात वाढदिवसाच्या पार्टीत दोन गटांत तुफान राडा, तरुणीचा विनयभंग तर एकावर जीवघेणा हल्ला (प्रातिनिधिक फोटो)

Nagpur Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

नागपूर, 3 नोव्हेंबर : वाढदिवसाच्या पार्टीत (birthday party) दोन गटांत झालेल्या वादानंतर तुफान राडा (clash between two groups) झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपुरातील (Nagpur) एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीसोबत गैरवर्तन केल्याच्या रागातून एका गटाने दुसऱ्या गटातील व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. यानंतर दोन गटांत तुफान हाणामारी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील हॉटेलमध्ये एका वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. पार्टी रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने त्यांनी हॉटेलमध्येच रूम बूक करुन थांबण्याचा निर्णय घेतलेला.

पार्टी रंगात आली होती, पहाटे साडे चारवाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. त्यावेळी यश शर्मा हा आपल्या मित्रांसोबत तेथे आला होता. यश हा सोफ्यावर पाय ठेवून बसलेला होता. यावेळी वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या एका तरुणाने यशला सोफ्यावरुन पाय खाली ठेवण्यास सांगितले आणि त्यानंतर त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली.

वाचा : आजी-मामीसोबतची मस्करी जीवावर बेतली, नागपुरात 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद इतका वाढला की, वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या एका तरुणीचा विनयभंग केल्याच्या रागातून पार्टीतील तरुणांनी यशवर हल्ला केला. एका तरुणाने काचेची बाटली फोडून यशच्या डोक्यात, हातावर वार केले. या हल्ल्यात यश जखमी झाला.

यानंतर यश हा आपल्या मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करत असलेल्या तरुणांच्या खोलीत शिरला आणि मग दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांत सुरू असलेला हा वाद पहाटे जवळपास 6 वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या यशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पाच दिवसांपूर्वी सुद्धा पार्टीनंतर हत्येची घटना

गुरुवारी (28 ऑक्टोबर 2021) रात्री नागपुरात एका तरुणाने आपल्या मित्रांची निर्घृण पद्धतीने हत्या केली आहे. आरोपी तरुणाने दारूपार्टी केल्यानंतर आपल्या मित्रावर कुदळने जबरी वार करत त्याची हत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका दुकानासमोर मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

कमलेश गिरडे असं हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पारडी परिसरातील एकता नगर येथील रहिवासी आहे. मृत कमलेश हा मजूर असून तो मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. तो अनेकदा आपल्या घरी जायचा नाही. बाहेरच मिळेल तिथे मुक्काम ठोकायचा. दरम्यान, गुरुवारी नेहमीप्रमाणे तो कामासाठी घरातून बाहेर गेला. नागपुरातील महाल परिसरातील एका बांधकामाच्या इमारतीवर तो कामासाठी गेला होता.

First published:

Tags: Crime, Nagpur