मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

फुगा फुगवता फुगवता फुटला अन् घशात अडकला, 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

फुगा फुगवता फुगवता फुटला अन् घशात अडकला, 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

प्रातिनिधिक फोटो (फोटो - पीटीआय)

प्रातिनिधिक फोटो (फोटो - पीटीआय)

Child died after ballon stuck in throat: नागपुरात एका फुग्यामुळे सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  Sunil Desale

नागपूर, 3 नोव्हेंबर : ऐन दिवाळीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. नागपुरात (nagpur) एका सहावर्षीय मुलाच्या घशात फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू (Child died after balloon stuck in throat) झाला आहे. ही घटना नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. फुगा फुगवत असताना तो फुटला आणि सहा वर्षीय चिमुकल्याच्या घशात अडकला. घशात फुगा अडकल्याने या चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेनेत संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन परिसरातील स्वराज विहार कॉलनी येथे ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास 6 वर्षीय चिमुकला आपल्या घराच्या बाहेर फुग्यांसोबत खेळत होता. यावेळी तो फुगा फुगवण्याचा प्रय्तन करत होता. फुगा फुगवता फुगवता अचानक फुटला आणि मग त्याचा एक तुकडा चिमुकल्याच्या घशात अडकला. फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने या चिमुकल्याला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला.

वाचा : वाढदिवसाच्या पार्टीत दोन गटांत तुफान हाणामारी

यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. ऐन दिवाळीत घडलेल्या या घडनेने सरंवांनाच एक धक्का बसला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दुसऱ्या घटनेत 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

नागपुरात एका 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. संबंधित मुलाने आपल्या आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी स्वयंपाकघरातील गॅसचा पाइप काढला होता. गॅसचा पाइप काढताच संबंधित मुलगा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या या मुलाला नातेवाईकांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रुग्णालयात जाताच मुलाचा मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवसात मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपुरातील सिव्हिल लाइंसच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनीत राहणारा मुलगा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. संबंधित मुलगा अडीच वर्षांचा असताना, त्याचे आई-वडील विभक्त झाले होते. त्यामुळे तो अगदी लहानपणापासून आपल्या आजीकडे राहत होता. त्याची आई सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे वास्तव्याला आहे.

दरम्यान, घटनेच्या दिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत मुलाची आजी (वय-60) आणि मामी (वय-26) दोघंही स्वयंपाक घरात काम करत होते. याच वेळी मृत मुलाला मस्करी सुचली. आपल्या आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी संबंधित मुलाने स्वयंपाक घराची गॅसची नळी काढायला सुरुवात केली. त्यामुळे आजी आणि मामीने त्याला झापलं. पण तरीही त्याची मस्करी थांबली नाही. अखेर अल्पवयीन मुलाची मस्करी त्याच्या अंगलट आली.

First published:

Tags: Diwali 2021, Nagpur