मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अश्लील व्हिडीओच्या आधारे महिलेवर 15 वर्षे बलात्कार; अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसही हादरले

अश्लील व्हिडीओच्या आधारे महिलेवर 15 वर्षे बलात्कार; अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसही हादरले

Crime in Dhule: शरीरसंबंधाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत (Threat to viral obscene video) दोन जणांनी एका विवाहितेवर तब्बल 15 वर्षे अत्याचार (married woman raped from last 15 years) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुढे वाचा ...

धुळे, 03 ऑक्टोबर: शरीरसंबंधाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत (Threat to viral obscene video) दोन जणांनी एका विवाहितेवर तब्बल 15 वर्षे अत्याचार (married woman raped from last 15 years) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं आपल्या अन्य एका साथीदाराच्या मदतीनं पीडितेला लग्नानंतरही नरक यातना दिल्या आहेत. आरोपींनी पीडितेला माहेरी आणि सासरी असताना देखील विविध हॉटेलवर नेत अत्याचार केले आहेत. मागील पंधरा वर्षांपासून नराधम आरोपी पीडितेचा गैरफायदा घेत होते. यानंतर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पीडितेवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसही हादरले आहे. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी मुख्य आरोपी नाना भदाणे याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged against 2 accused) केला आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नाना भदाणे याने अवधान परिसरातील एका शाळेत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पीडितेवर अत्याचार केला होता. यावेळी आरोपीनं पीडितेसोबत शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडीओ देखील शूट केला होता.

हेही वाचा-मैत्रिणीच्या मुलीला बर्थडेला नेलं अन्..; चिमुकलीच्या कौमार्याचा 40 हजारांत सौदा

त्यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी धमकी देत पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने अन्य एका साथीदाराच्या मदतीने पीडितेला नरक यातना दिल्या आहे. दोन्ही आरोपींनी पीडितेवर अनेकदा विविध ठिकाणी नेत अत्याचार केले आहे. हा संताजनक प्रकार 2006 पासून ऑगस्ट 2021 पर्यंत सुरू होता. आरोपींनी पीडित महिला माहेरी असताना आणि तिचं लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतरही तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे.

हेही वाचा-मुंबईतील महिलेवर आध्यात्मिक बाबाकडून विकृत कृत्य; नराधमाला गुजरातमधून अटक

अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजात बदनामी होईल, या कारणातून पीडित महिला आरोपींचा अत्याचार निमूटपणे सहन करत होती. पण आरोपींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं मोहाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Dhule, Rape