मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

"मी राजा होऊ शकत नाही म्हणून... जनता दरबार ऐवजी लोकसंवाद नाव" नितीन राऊतांचा राष्ट्रवादीवर निशाणा

"मी राजा होऊ शकत नाही म्हणून... जनता दरबार ऐवजी लोकसंवाद नाव" नितीन राऊतांचा राष्ट्रवादीवर निशाणा

""मी राजा होऊ शकत नाही म्हणून... जनता दरबार ऐवजी लोकसंवाद कार्यक्रम" नितीन राऊतांचा राष्ट्रवादीवर निशाणा

""मी राजा होऊ शकत नाही म्हणून... जनता दरबार ऐवजी लोकसंवाद कार्यक्रम" नितीन राऊतांचा राष्ट्रवादीवर निशाणा

Nitin Raut : नागपुरात काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नागपूर, 14 मे : महाविकास आघाडीत एकत्र असलेल्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातील संघर्ष आता आणखी वाढत असल्याचं दिसून येत आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या (Gondia Zilla Parishad) अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी बरोबर अभद्र युती केली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचं म्हटलं. त्यानंतर त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. याच दरम्यान आता काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्याधिकारी कार्यालयात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केलं. यावर नितीन राऊत यांनी म्हटलं, मी राजा महाराजा नाही आणि होऊ शकत नाही त्यामुळे मी आज नागपूर लोकांचे प्रश्न घेऊन येणाऱ्या कार्यक्रमाला जनता दरबार नाव दिलं नाही तर लोकसंवाद कार्यक्रम असे नाव दिले.

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जनता दरबार आरोजित करण्यात येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या, प्रश्न ऐकून त्यावर उपाययोजना करत असतात. याच जनता दरबारवरुन नितीन राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

नाना पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, केवळ हेडलाईन मिळवण्यापुरतं : अजित पवार

गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी बरोबर अभद्र युती केली आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक होत आपली नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला असं विधान नाना पटोले यांनी केलं. नाना पटोले यांनी केलेल्या विधानाचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक वक्तव्य केलं की. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. वास्तविक नाना पटोले यांचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं. कारण नानाच यापूर्वी कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले हे तुम्हाला माहिती आहे. मग आता भाजपने म्हणायचं का की, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते तिकडे गेले. हे तेवढ्या पुरतं हेडलाईन मिळवण्यापूरता पाठीत खंजीर खुपसला वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल. पण संघटनेत प्रत्येक पक्ष आपआपल्या परीने काम करत असतो. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आहे.

First published:

Tags: Nagpur, NCP, Nitin raut