नागपूर, 2 एप्रिल : कोणताही गुन्हेगार गुन्हा करताना आपण पकडले जाणार नाही, हाच विचार करत असतो. काही तर पकडल्यानंतर ही फरार होता आणि वर्षानुवर्षे तसेच फरार राहून फिरत असतात. काही वर्षांनंतर आता आपल्याला पोलिस परत पकडू शकणार नाही अशा आवेशात ते वावरत असतात. मात्र अशाच 351 डॉनची हवा काढणाऱ्या एका शूर पोलिस अधिकाऱ्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
नागपूर पोलिस दलाची शान असलेल्या या जेम्स बाँडचे नाव आहे विलास चौबितकर. विलास चौबितकर हे नागपूर पोलिस दलामध्ये साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. गुन्हेशाखेच्या शोधपथकात काम करत असलेल्या चौबितकर यांचे काम फरार गुन्हेगारांचा शोघ घेण्याचं आहे. आज फरार गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या चौबितकर यांनी सर्वप्रथम 2014 मध्ये फरार गुन्हेगाराचा शोध लावला होता. तो 44 वर्षांपासून वाँटेड होता. न्यायालयात हजर राहत नव्हता. पोलिसांना गुंगारा देत होता. पण विलास चौबितकर यांना गुंगारा देणं मात्र त्याला जमलं नाही, आणि विलास यांनी त्याला पुन्हा गजाआड केलं. तेव्हापासून सुरू झालेल्या या चोर पोलिसाच्या खेळात चौबितकर यांनी आतापर्यंत तब्बल 351 फरार डॉनची हवा काढली आहे.
वाचा - क्रिकेट सामन्यादरम्यान किरकोळ वाद; बॅटनं मारहाण झाल्यानं मोहितचा मृत्यू
विक्रमी कामगिरी
चौबितकर यांनी आजवर 20, 25, 30, 35 वर्षे फरार असलेल्या अनेक गुन्हेगारांचा शोध लावून त्यांना पुन्हा गजाआड केलं आहे. काही गुन्हेगारांचा शोध घेताना त्यांना मृत्यू झालेला असल्याचेही चौबितकर यांच्या तपासात समोर आले. एवढंच नाही तर एका वर्षामध्ये 100 फरार आरोपींचा शोध लावण्याचा विक्रमही चौबितकर यांच्या नावावर आहे.
वाचा - छेडछाडीच्या तक्रारीसाठी गेलेल्या वडिलांना पोलिसांनी हकललं, पुढे आक्रीतच घडलं
इतरांनाही मार्गदर्शन
फरार असलेल्या आरोपींना शोधण्यासाठी चौबितकर यांनी एक खास शैली अवगत केली आहे. पोलिस दलातील इतरांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून ते याबाबत इतरांना मार्गदर्शन करत असतात. त्यासाठी चौबितकर हे अनेक ठिकाणी कार्यशाळाही घेत असतात.
View this post on Instagram
गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही चौबितकरांच्या धडाडीचं कौतुक केलं आहे. त्यासाठी त्यांनी ट्वीट करत 'पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो', असं लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Criminal, Maharashtra police