Home /News /nagpur /

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाची तब्बल 16 तास झाडाझडती

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाची तब्बल 16 तास झाडाझडती

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाची तब्बल 16 तास झाडाझडती

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाची तब्बल 16 तास झाडाझडती

Income Tax raid at Anil Deshmukh properties: अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. देशमुखांच्या घरी तब्बल 16 तास आयकर विभागाकडून झाडाझडती करण्यात आली.

नागपूर, 18 सप्टेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. ईडी आणि सीबीआयकडून छापेमारी करण्यात आल्यावर देशमुखांच्या मालमत्तांवर शुक्रवारी आयकर विभागाने धाड (Income Tax raid on Anil Deshmukh properties) टाकली. आयकर विभागाकडून तब्बल 16 तास झाडाझडती करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपुरातील (Nagpur) निवासस्थानी शुक्रवारी दाखल झालेल्या आयकर विभागाच्या टीम शनिवारी पहाटे झाडाझडती करुन निघाल्या. अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आणि त्यासोबतच त्यांच्या इतरही मालमत्तांवर आयकर विभागाने शुक्रवारी धाड टाकली. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून तब्बल 16 तास झाडाझाडती करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत अनिल देशमुख यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. आज आणि उद्या सुद्धा चौकशी? सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरातून निघाले. यावेळी अनिल देशमुख यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल्स आपल्यासोबत नेल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच आज आणि उद्या देखील अनिल देशमुख यांच्या संदर्भात आयकर विभागाकडून चौकशी आणि झाडाझडती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी अनिल देशमुख यांच्या घरी ज्यावेळी आयकर विभागाने धाड टाकली त्यावेळी त्यांच्या घरी अनिल देशमुख आणि त्यांची दोन्ही मुलं उपस्थित नव्हते. तर अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि सून घरी होत्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला. काही दिवसांपूर्वी मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी जवळपास पाच वेळा समन्स सुद्धा बजावले आहे. मात्र, अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी अद्याप हजर राहिलेले नाहीयेत. त्यातच आता इन्कम टॅक्स विभागाच्या छापेमारीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. 25 मार्च रोजी सीबीआयने पहिल्यांदा अनिल देशमुखांच्या नागपूर येथील घरी छापा टाकला 24 एप्रिल रोजी ईडीने पहिल्यांदा अनिल देशमुख यांच्या निवस्थानी छापेमारी केली केली त्यांनतर 16 मे, 26 मे, 16 जुलै आणि 6 ऑगस्टला परत ईडीने कारवाई केली होती 17 सप्टेंबरला आता इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली होती. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Anil deshmukh, Income tax, Nagpur

पुढील बातम्या