• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Anil Deshmukh: अनिल देशमुखांना ईडीचा दणका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना ईडीचा दणका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख यांची संपत्ती जप्त केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 जुलै: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने (ED) जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (money laundering) ईडीने ही कारवाई केली आहे. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. अखेर या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाई सुद्धा सुरू केली आहे. Sharad Pawar, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी तर Nana Patole प्रियंका गांधींच्या दारी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आपल्यावर झालेल्या आरोपांनंतर तसेच मुंबई हायकोर्टाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी एप्रिल महिन्यात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वी ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून अनिल देशमुख यांच्या घरी धाड सुद्धा टाकण्यात आली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देखमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पलांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता. अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, या प्रकरणात अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर संजीव पलांडे यांना अटक सुद्धा झाली. त्यानंतर अनिल देशमुख यांना ईडीने समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
  Published by:Sunil Desale
  First published: