नागपूर, 17 सप्टेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर आज इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी (Income Tax raid) केली आहे. नागपुरातील त्यांच्या मालमत्तेवर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला आहे. (IT raid on Anil Deshmukh properties) अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी इन्कम टॅक्स विभागाची टीम दाखल झाली आहे. नागपुरातील जीपीओ चौक येथील निवास स्थानावर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्या काटोल निवास स्थानावर देखील इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यासोबतच नागपूरच्या हॉटेल ट्राव्होटेल येथे देखील इन्कम टॅक्सने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भावी सहकारी विधानावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला. काही दिवसांपूर्वी मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी जवळपास पाच वेळा समन्स सुद्धा बजावले आहे. मात्र, अनिल देशमुख हे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी अद्याप हजर राहिलेले नाहीयेत. त्यातच आता इन्कम टॅक्स विभागाच्या छापेमारीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. 25 मार्च रोजी सीबीआयने पहिल्यांदा अनिल देशमुखांच्या नागपूर येथील घरी छापा टाकला 24 एप्रिल रोजी ईडीने पहिल्यांदा अनिल देशमुख यांच्या निवस्थानी छापेमारी केली केली त्यांनतर 16 मे, 26 मे, 16 जुलै आणि 6 ऑगस्टला परत ईडीने कारवाई केली होती आज 17 सप्टेंबरला आता इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.