मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

जीवापेक्षा डायनिंग टेबल ठरला महत्त्वाचा; भाऊबीजेदिवशीच महिलेनं उचललं धक्कादायक पाऊल

जीवापेक्षा डायनिंग टेबल ठरला महत्त्वाचा; भाऊबीजेदिवशीच महिलेनं उचललं धक्कादायक पाऊल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Suicide in Nagpur: नागपूर शहराच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशीच येथील एका महिलेनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

  • Published by:  News18 Desk

नागपूर, 08 नोव्हेंबर: नागपूर शहराच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशीच येथील एका महिलेनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. दिवाळीची खरेदी झाल्यानंतर मृत महिलेनं घरात नवीन डायनिंग टेबल घेण्याची मागणी आपल्या पतीकडे केली होती. पण पैसे नसल्याने पतीने पत्नीच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. घरात नवीन डायनिंग टेबल न घेतल्याने (husband not purchase new dining table) संबंधित महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली (wife commits suicide) आहे. पतीच्या फिर्यादीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संगीता राजन पाटील असं आत्महत्या करणाऱ्या 42 वर्षीय महिलेचं नाव असून त्या हुडकेश्वरमधील बेसा परिसरातील टेक ऑफ सिटीच्या सी विंगमधील रहिवासी होत्या. मृत संगीता ह्या गृहिणी असून त्यांचे पती राजन पाटील हे खाजगी नोकरी करतात. दिवाळी सणाची खरेदी झाल्यानंतर संगीता यांनी आपल्या पतीकडे डायनिंग टेबलची मागणी केली होती. शनिवारी भाऊबीजेच्या दिवशी सकाळपासूनच त्यांनी आपल्या पतीकडे डायनिंग टेबलसाठी हट्ट धरला होता.

हेही वाचा-पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्..; डजनभर नराधमांनी तोडले लचके, नग्नावस्थेतच फेकलं

पण दिवाळीची खरेदी करण्यात बराच पैसा खर्च झाल्याने डायनिंग टेबल आपण पुढच्या वेळी घेऊ, असं पती राजन यांनी आपल्या पत्नीला सांगितलं. पण हट्टाला पेटलेल्या पत्नीने राजन यांचं ऐकलं नाही, त्यांनी घरात नवीन डायनिंग टेबल आणावा, यासाठी बरीच आदळआपट केली. पण राजन यांच्याकडे पैसे नसल्याने ते आपल्या पत्नीचा हट्ट पुरवू शकले नाहीत.

हेही वाचा-लपायला गेली अन् आयुष्यभरासाठी झाली नजरेआड; लिफ्टमधून पडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत

पतीने डायनिंग टेबल घेऊन देण्यास दिलेला नकार संगीता यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे संतापलेल्या संगीता यांनी शनिवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. पती राजन शंकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. केवळ डायनिंग टेबल घेऊन न दिल्याच्या कारणातून महिलेनं आपल्या आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Nagpur, Suicide