मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

...म्हणून अजित पवार आणि जयंत पाटलांवर FIR दाखल करा, भाजप नेत्याची मागणी

...म्हणून अजित पवार आणि जयंत पाटलांवर FIR दाखल करा, भाजप नेत्याची मागणी

Nagpur News: आज नागपूरात पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते (BJP leader) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडी सरकाराच्या अपयशाबद्दल टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकार विदर्भातील ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पुढे वाचा ...

नागपूर, 10 एप्रिल: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना स्थिती (Corona pandemic in Maharashtra) नियंत्रणाबाहेर जात आहे. मुंबई, पुण्यासह नागपूरही कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट (Corona hotspot) बनलं आहे. अशा स्थितीत राज्य सरकार विदर्भातील ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका भाजप नेते (BJP leader) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. नागपूरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकाराच्या अपयशाबद्दल टीकास्त्र सोडलं आहे. तसेच सरकार कोरोना प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत असून ते पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur assembly election) जास्त रस दाखवत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना सरकार मात्र पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंग आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) हे हजारोंच्या बैठका घेत आहेत. अशा बैठकांमुळे कोरोना विषाणू सुपर स्प्रेडर बनत आहे. पण याकडे सरकारातील नेत्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवार आणि जयंत पाटलांवर गुन्हे (FIR) दाखल करायला पाहिजेत, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

(हे वाचा-काँग्रेस आमदार आणि अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन)

कोरोना विषाणूचं कारण सांगून विरोधकांना आंदोलन करण्यापासून रोखलं जातंय. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. जर सरकारने याकडे लक्ष दिलं नाही, तर आम्हीही असंच वागू असा इशाराही भाजप नेते बावनकुळे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कारण ग्रामीण भागातील जनता चिडली आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर ग्रामीण भागातील लोकं रस्त्यावर उतरतील. वीज प्रश्नावरही ठोस निर्णय घेतला नाही, तर आम्ही 10 हजार लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आणि वास्तव मांडू असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे. सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या केंद्रसरकारची एक टीम राज्यात फिरत आहे,  पण महाराष्ट्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

First published:

Tags: Ajit pawar, Jayant patil, Nagpur