नांदेड, 10 एप्रिल : देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (Congress MLA Raosaheb Antapurkar) यांचं मुंबईत निधन झालं आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान रावसाहेब अंतापूरकर यांची प्रकृती खालावली आणि शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतला.
आमदार रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनानंतर अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. 'माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना,' अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना. pic.twitter.com/WxNc51ovsO
— Ashok Chavan (@AshokChavanINC) April 9, 2021
बॉम्बे हॉस्पिटल इथं मागील 12 दिवसांपासून ते उपचार घेत होते. मात्र कोरोनाची लागण झालेली असतानाच त्यांना इतरही काही आजार होते. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांच्या शरीराने अपेक्षित प्रतिसाद दिला नाही आणि त्यांचं निधन झालं. याआधीही त्यांना एकदा ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 2 मुली असा परिवार आहे.
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा जीवनप्रवास
- देगलूर तालुक्यातील अंतापूर येथील रहिवासी
- देगलूर मानव्य विकास शाळेत 10वी पर्यंतचं शिक्षण
- विद्युत अभियांत्रिकी पदवीधर औरंगाबाद
- राजकारणात येण्याअगोदर मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता, 2009 साली दिला राजीनामा
- 2009 मध्ये ते सुभाष साबणे यांच्या विरोधात 7 हजार मतांनी निवडून आले
- 2014 मध्ये साबणेंच्या विरोधात पराभव
- 2019 मध्ये पुन्हा साबणेंना पराभव करुन 36 हजार मतांनी विजय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.