पंढरपुरातील मंगळवेढयात दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
व्यायामला जात असल्याचं सांगून मंगळवेढा-पंढरपूर रोडला गेलेल्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मंगळवेढा शहरातील किल्ला भागातील शहदाब अमजद रजबअली (वय 11) व त्याचा मित्र प्रज्वल हेमंत लोहार (वय 10) रा, मारवाडी गल्ली, या दोघांचा मृत्यू झाला आहे.
वारंवार लहान मुलांना पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जातो. त्यांनी एकट्याने तिथं जाऊ नये म्हणून रोखलं जातं. मात्र यामागे त्यांची सुरक्षितता महत्त्वाची असते.
या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी आपल्या लहान मुलांना एकटं अशा ठिकाणी पाठवू नये असं आवाहन केलं जात आहे.